भारतातून अमेरिकेला जाणारी पूर्ण पोस्ट बुकिंग रद्द
Full post booking from India to America cancelled
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लावून धक्का दिला. आता टॅरिफच्या वादात भारताने अत्यंत मोठा निर्णय अमेरिकेबद्दल घेतलाय. भारतीय पोस्ट विभागाने हा निर्णय घेतला आहे.
मनोज जरांगे सोबत पहिलीच चर्चा निष्फळ
भारतातून अमेरिकेला जाणारी पूर्ण पोस्ट बुकिंग रद्द करण्यात आली आहे. मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशंस यांनी रविवारी स्पष्ट केले की, अमेरिकेला जाणारी पत्र,
कागदपत्रे आणि गिफ्ट सर्व प्रकारचे पार्सलची सेवा भारतीय पोस्ट विभागाने बंद केलीये. अमेरिकेने टॅरिफ लावल्यानंतर हा निर्णय आता भारत सरकारकडून घेण्यात आला आहे.
सेवानिवृत्तीबद्दल स्वारामती विद्यापीठाचे लेखाधिकारी मोहमद शकील अब्दुल करीम यांचा सत्कार सोहळा संपन्न
अमेरिकेला जाणारे टपाल वाहतूक करण्यास विमान कंपन्यांची सततची असमर्थता यासोबतच अमेरिकेने लादलेल्या टॅरिफच्या तणावामुळे अमेरिकेने टपाल सेवांवर 100 कोटींचा टॅरिफ लादला आहे,
असे दळणवळण मंत्रालयाने स्पष्ट म्हटले. नवीन नियमांनुसार, 100 डॉलर्सपर्यंतच्या पत्रे, कागदपत्रे आणि भेटवस्तूंसह सर्व प्रकारच्या पोस्टल वस्तूंचे बुकिंग पूर्णपणे बंदी घालण्यात आली.
सुरूवातीला काही गोष्टींवर बंदी घालण्यात आली होती. मात्र, आता पूर्णपणे अमेरिकेला जाणारी सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मराठा आंदोलनाबद्दल शिंदे म्हणाले ,मी सगळं खुलेआम करतो. लपून छपून, बंद दाराआड काही करत नाही
अमेरिकेने भारतातून येणाऱ्या कागदपत्रे आणि भेटवस्तूंवरही मोठा टॅरिफ लावला आहे. यानंतर भारतीय पोस्ट विभागाने मोठा निर्णय घेत स्पष्ट केले की, आम्ही पोस्ट सेवा बंद करत आहोत.
सुरूवातीला काही प्रमाणात बंदी घालण्यात आली होती. मात्र, आता भारत अमेरिकेतील पोस्ट सेवा ही पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. अमेरिकेने भारतावर तब्बल 50 टक्के टॅरिफ लावला आहे.
मराठा आंदोलकांचा सुप्रिया सुळे यांना घेराव,घोषणाबाजी
यामुळे अमेरिकेत जाणाऱ्या भारतीय वस्तू 70 टक्के कमी झाल्याच आहेत. कारण इतका मोठा टॅरिफ म्हटल्यावर मिळणारा नफा हा कमी झालाय.
रशियाकडून भारत हा तेल खरेदी करत असल्याने आपण टॅरिफ लावत असल्याचे अमेरिकेने म्हटले. फक्त हेच नाही तर भारताने जर रशियाकडून तेल खरेदी करणे थांबवले तर आम्ही भारतावरील 25 टक्के टॅरिफ कमी करू,
चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या विधानामुळे मराठा समाज आक्रमक
असे त्यांनी म्हटले. मात्र, अमेरिकेतील निर्यात कमी झाल्याने भारतातील अनेक उद्योगांवर याचा थेट परिणाम झाला आहे. मात्र, भारत हा अमेरिकेच्या दादागिरीपुढे झुकत नसल्याचे स्पष्ट होताना दिसत आहे.








