सीएसएमटी रेल्वे स्थानकात आंदोलकांचे बस्तान ,नोकरदार वर्गाची गैरसोय

Protesters' camp at CSMT railway station, inconvenience to the working class

 

 

सलग तिसऱ्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात मराठा बांधवांचे आंदोलन सुरू आहे. सीएसएमटी रेल्वे स्थानकात आंदोलकांनी बस्तान मांडले असून घोषणाबाजी, नाचगाणे सुरू आहे.

 

येथे मराठा बांधवांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने प्रवासी, नोकरदार वर्ग यांची गैरसोय होत आहे. तसेच गेले तीन दिवस सीएसएमटी जंक्शन परिसरातील वाहतूक विस्कळीत झाल्याने प्रवाशांची गैरसोय झाली.

ट्रम्पमुळे भारतातील 20 लाख लोक झाले बेरोजगार; ‘या’ 5 क्षेत्रातील नोकऱ्या गेल्या

सीएसएमटी परिसरात मराठा आंदोलक मोठ्या संख्येने जमले आहेत. याच ठिकाणी आंदोलकांचे जेवण, झोपणे होत आहे. राज्यभरातील बहुसंख्य मराठा आंदोलक रेल्वे गार्गाने गुंबई गाठत आहेत.

 

तसेच मुंबई महानगरातील मराठा आंदोलक मध्य रेल्वेच्या मुख्य, हार्बर मागनि सीएसएमटी स्थानकात येत आहेत. त्याचप्रमाणे पनवेल, वाशी, नेरूळ, कल्याण, ठाणे येथून आंदोलक मुंबईत येत आहेत.

मराठा आंदोलकांचा सुप्रिया सुळे यांना घेराव,घोषणाबाजी

त्यामुळे सीएराएगटी स्थानकात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. प्रत्येक लोकलमधून आंदोलक उतरत असून ते जोरदार घोषणाबाजी देत आहेत. त्यामुळे सीएसएमटीमध्ये फक्त मराठा आंदोलकांना आवाज ऐकू येत आहे.

 

भारतातून अमेरिकेला जाणारी पूर्ण पोस्ट बुकिंग रद्द
मुख्य सीएसएमटीच्या इमारतीच्या समोरील दुतर्फा रस्त्यावर देखील ध्वनिक्षेपक लावून, मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील यांच्या नावाचा जयजयकार करत विविध गाण्यांवर नाचत आहेत.

 

मुंबई महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडून आझाद मैदानात डॉक्टरांच्या तीन टीम तैनात ठेवण्यात आल्या आहेत. मात्र मैदानाबाहेरील बांधवांसाठी माऊली चॅरिटेबल अॅड मेडिकल ट्रस्ट मुंबई यांच्या वतीनेही सहा डॉक्टरांची टीम कार्यरत आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांचा फटका, मुंबईमधील व्यावसायिक संकटात

यावेळी मराठा बांधवांची तपासणी करून मोफत औषध वाटप करण्यात आले. ताप, थंडी, कंबर दुखी, ॲलर्जी यांनी आंदोलक त्रस्त आहेत.

 

मराठा बांधवांची खाण्यापिण्याची सोय होत नसल्याने रविवारी पुणे, नाशिक, बीड येथील विविध गाव खेड्यातून मराठा बांधवांसाठी चपाती – भाकरी, लोणचे, ठेचा तसेच पाणी बाटली आणि बिस्कीट, फरसाणचे पुडे आले.

मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा

प्रत्येक जिल्ह्यातून एक दिवस जेवणाच्या गाड्या येणार आहेत. ५० गाड्या जेवणाच्या असून, त्या दररोज मुंबईत येणार आहेत. बीड जिल्ह्यातून सुमारे १ हजार बॉक्स पाणी बॉटल आल्या आहेत

 

Related Articles