अफगाणिस्तानमध्ये भूकंप ; 250 नागरिकांचा मृत्यू 500 पेक्षा जास्त जखमी

Earthquake in Afghanistan; 250 civilians killed, more than 500 injured

 

 

 

अफगाणिस्तानला रविवारी रात्री उशिरा 6.0 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसला. अमेरिकी भूवैज्ञानिक सर्वेक्षणानुसार पाकिस्तानच्या सीमेजवळ पूर्व अफगाणिस्तानच्या भागाला भूकंपाचे झटके बसले.

भारतातून अमेरिकेला जाणारी पूर्ण पोस्ट बुकिंग रद्द

यूएसजीएसनुसार भूकंपाच केंद्र नंगरहार प्रांतात जलालाबादच्या जवळ आहे. या भूकंपामुळे अफगाणिस्तानातात मोठ्या प्रमाणात जिवीतहानी व वित्तहानी झाली आहे.

 

नांगहार प्रांतात 250 नागरिकांचा मृत्यू झाला असून 500 पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. या भूकंपाच्या धक्क्यानंतर अनेक घरं मातीच्या ढिगाऱ्यांमध्ये बदलली.

 

अनेक भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. भूकंपाची तीव्रता इतकी होती की, भारताच्या काही भागात दिल्ली-एनसीआरपर्यंत भूकंपाचे धक्के जाणवले.

डोनाल्ड ट्रम्प यांचा फटका, मुंबईमधील व्यावसायिक संकटात

त्याशिवाय पाकिस्तानातही काही भागात भूकंपाचे झटके बसले. नांगहार प्रांतातच 20 मिनिटानंतर दुसरा भूकंप आला. त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.5 होती. खोली 10 किलोमीटर होती. रविवारी स्थानिक वेळेनुसार हा भूकंप 11.47 वाजता आला.

 

7 ऑक्टोंबर 2023 रोजी अफगाणिस्तानात 6.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप आला होता. तालिबान सरकारच्या अंदाजानुसार त्यावेळी 4000 नागरिकांचा मृत्यू झाला होता. सयुंक्त राष्ट्राने मृताचा आकडा कमी जवळपास 1500 सांगितला होता. अफगाणिस्तानात असे भूकंपाचे धक्के येत असतात.

मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा

अफगाणिस्तानात मागच्या महिन्याभरात भूकंप येण्याची ही पाचवी वेळ आहे. भूकंपाच्या दृष्टीने हा संवेदनशील भाग आहे. 27 ऑगस्टला 5.4 रिश्टर स्केल तीव्रतेचा, 17 ऑगस्टला 4.9 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप आला होता.

 

भूकंप रिश्टर स्केलवर मोजला जातो. त्याला रिक्टर मॅग्नीट्यूड टेस्ट स्केल म्हणतात. रिक्टर स्केलवर भूकंप 1 ते 9 च्या आधारावर मोजला जातो. भूकंपाच्यावेळी पृथ्वीच्या पोटातून तप्त ऊर्जा बाहेर निघते.

सीएसएमटी रेल्वे स्थानकात आंदोलकांचे बस्तान ,नोकरदार वर्गाची गैरसोय

रेड क्रॉसनुसार, अफगाणिस्तानातील हिंदूकुश पर्वत रांगांचा भाग भूवैज्ञानिक दृष्टीने खूप सक्रीय आहे. तिथे दरवर्षी भूकंप येत असतात. हा भाग भारतीय आणि यूरेशियन टेक्टॉनिक प्लेट्सवर आहे. एक फॉल्ट लाइन थेट हेरातमधून जाते.

 

 

Related Articles