अमेरिकेत याल तर खबरदार,भारतीयांना इशाऱ्याने खळबळ

Be careful if you come to America, Indians are shocked by the warning

 

 

डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेल्या टॅरिफमुळे भारत आणि अमेरिका यांच्यात तणाव वाढला आहे. ट्रम्प यांनी अजूनही हा टॅरिफ कमी करण्याबाबत कोणतेही संकेत दिलेले नाहीत.

 

शबाना महमूद ब्रिटनच्या गृहसचिवपदावर ,शबाना महमूद आहेत तरी कोण?

भारतानेही अमेरिकेपुढे हात न जोडण्याची भूमिका स्वीकारली असून चीनसारख्या देशांसोबत भारत आपले व्यापारविषयक संबंध दृढ करत आहे.

 

असे असतानाच आता अमेरिकेतून चिंता वाढवणारी आणखी एक माहिती समोर येत आहे. या माहितीमुळे आता अमेरिकेत राहू इच्छीणाऱ्यांची चिंता वाढली आहे.

आरक्षण हायकोर्टात जाण्याची शक्यता,मराठा समाजाने घेतला मोठा निर्णय

अमेरिकी दूतावासाने आपल्या सोशल मीडिया खात्यावर एक संदेश जारी केला आहे. अमेरिकेत राहण्यासंदर्भातील नियमांबाबत या पोस्टमध्ये माहिती देण्यात आली आहे.

 

अमेरिकेत अधिकृतपणे राहण्याचा तुमचा कालावधी हा तुमच्या व्हिसाच्या तारखेवर अवलंबून नसते, तर तुम्ही अमेरिकेत अधिकृतपणे किती दिवस राहू शकता हे फॉर्म-94 वर दिलेल्या तारखेवर अवलंबून असते,

 

असे अमेरिकेच्या दूतावासाने म्हटले आहे. विशेष म्हणजे मुदत संपूनही अमेरिकेत थांबल्यास त्याचे परिणाम वाईट होऊ शकतील. तुमच्या अमेरिकेतील पुढच्या प्रवासात अडचणी येऊ शकतात, असेही अमेरिकी दूतावासाने सांगितले आहे.

महाराष्ट्रात मतचोरी कशी केली याच्या डॉक्युमेंट्रीची लिंक SMS पाठविण्यास TRAI चा नकार
भारतीय नागरिकांना अमेरिकी कायद्यामुळे अडचण येऊ नये यासाठी अमेरिकेतील दूतावासाने उपायदेखील सूचवला आहे.

 

अमेरिकेत थांबण्यासाठीची मुदत किती आहे हे पाहण्यासाठी https://i94.cbp.dhs.gov/ या संकेतस्थळाला भेट द्या, असेही दूतावासाने सांगितले आहे.

मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबियांना १०-१० लाखांची मदत

हे संकेतस्थळ अमेरिकेतील कस्टम्स अँड बॉर्डर प्रोटेक्शन विभागातर्फे चालवले जाते. या संकेतस्थळावर अमेरिकेत जाणाऱ्या परदेशी नागरिकांची माहिती उपलब्ध असते.

 

अमेरिकेत गेल्यानंतर तेथील कायद्यांची माहिती नसल्यामुळे भारतीय नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. काही वेळा मुदत संपलेली असूनही अनेक भारतीय अमेरिकेतच राहतात.

आघाडीकडून भाजपा आणि नितीश कुमार यांना रोखण्यासाठी बिहारमध्ये मोठा निर्णय

आय-94 फॉर्मवर असलेल्या तारखेपेक्षा जास्त काळ अमेरिकेत थांबल्यास त्याला ओव्हरस्टे म्हटले जाते. अशी वेळ आलीच तर तिथे कायदेशीर मार्गाने कारवाई केली जाते. अशा स्थितीत भारतीय नागरिक अडकू नयेत म्हणून अमेरिकी दूतावासाने या सूचना जारी केल्याचे म्हटले जात आहे.

 

 

Related Articles