कृषीमंत्री धनंजय मुंडेंना कोरोनाची लागण
Agriculture Minister Dhananjay Munde infected with Corona

राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटमुळे देशात चिंतेचं वातावरण आहे. त्यातच राज्यातल्या एका महत्त्वाच्या मंत्र्याला कोरोनाने घेरले आहे.
नागपूर अधिवेशन संपल्यानंतर अस्वस्थ वाटू लागल्याने मी तपासणी केली असता पुन्हा एकदा कोविड पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले.
मला सध्या फारसा त्रास नाही, मात्र डॉक्टरांच्या सल्ल्याने मागील 4 दिवसांपासून क्वारंटाईन राहून योग्य उपचार घेत आहे. काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही.
मी लवकरच बरा होऊन आपल्या सर्वांच्या सेवेतपुन्हा दाखल होईल. सध्या थंडीचे वातावरण असून कोविडच्या नव्या आवृत्तीने शिरकाव केला आहे. त्यादृष्टीने घाबरून न जाता सर्वांनी आरोग्याची योग्य ती काळजी घ्यावी.
नाताळ सणाच्या पूर्वसंध्येला कोरोना रुग्ण वाढत असल्याचं दिसून येत आहे. देशामध्ये आतापर्यंत ३ हजार ७४२ नवीन कोरोना रुग्ण आढळून आलेले आहेत. शनिवारी ७५२ कोरोना रुग्ण आढळून आलेले होते.
नवी दिल्ली, गोवा, गुजरात, कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र, पंजाब, तमिळनाडू, तेलंगणा या राज्यांमध्ये नवीन कोरोना रुग्ण सापडले आहेत. केंद्र सरकारने राज्यांना अलर्ट मोडवर राहण्याचे निर्देश दिलेले आहेत.
करोना विषाणूचा नवीन उपपक्रार असलेल्या ‘जेएन.१’ने आरोग्य यंत्रणेची चिंता वाढवलेली असताना देशात करोनाबाधित रुग्णांची संख्यादेखील झपाट्याने वाढू लागली आहे.
देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी ‘जेएन.१’ने बाधित रुग्ण आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. केरळ, महाराष्ट्र, गोव्यासह अनेक राज्यांमध्ये जेएन.१ बाधित रुग्णांवर उपचार चालू आहेत.
दरम्यान, देशात करोनाबाधित रुग्णांची संख्यादेखील वाढली आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे की, या एका महिन्यात जगभरात ५२ टक्के करोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे.