स्व.रा.ती.म विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचे अधीक्षक शेख सिकंदर अली यांना पापंटवार गौरव पुरस्कार जाहीर
Papantwar Gaurav Award announced for Sheikh Sikander Ali, Superintendent of Examinations Department of S.R.T.M. University

नांदेड येथील गंगाधर रावजी पापंटवार यांच्या जयंती महोत्सवानिमित्त टीचर्स क्लब रुग्णालय व गंगाधररावजी पापंटवार वैद्यकीय सहकारी संस्थेच्या सातव्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून जीवन गौरव पुरस्कार घोषित करण्यात आले आहेत ,
रोहित पवारांचा खळबळजनक आरोप, 90 कोटींवरुन बावनकुळेंशी भिडले
विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे , यामध्ये विशेष सन्मान म्हणून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथील परीक्षा विभागाचे अधीक्षक शेख सिकंदर अली शेख हिम्मत अली याना गौरविण्यात येणार आहे.
15 राजकीय पक्षांना नोटीस,राष्ट्रवादी काँग्रेसचाही समावेश
शेख सिकंदरअली हे विद्यापीठातील परीक्षा विभागातील कर्तव्य तत्पर अधिकारी असून विद्यापीठात आपल्या अडचणी घेऊन येणाऱ्या विद्यार्थी,शिक्षण याना योग्य मार्गदर्शन करून त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यात त्यांचा हातखंडा आहे,
मंत्र्याला जमावाने अक्षरशः लाथा घालून बदडले ;पहाVIDEO
दप्तर दिरांगाईला फाटा देत कार्य तत्पर पद्धतीने काम करण्यात त्यांची हातोटी आहे,मनमिळाऊ स्वभाव,मदतीला धावून जाण्याची वृत्ती यामुळे शेख सिकंदर अली हे विद्यापीठात लोकप्रिय आहेत.
त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.येत्या 15 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी चार वाजता कुसुम सभागृह नांदेड येथे या पुरस्कारांची वितरण करण्यात येणार आहे.
मंत्रिमंडळ निर्णय ९ सप्टेंबर, २०२५
पुरस्कारासाठी त्यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर संदीप एडके,काळबा हनवते ,सुनील रावळे ,अब्दुल बशीर,शेख शहाबुद्दीन ,रवी मैड यांच्यासह मित्र परिवारातर्फे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.









