दोन लाखाची लाच स्वीकारताना तहसीलदाराला रंगेहात अटक
Tehsildar arrested red-handed while accepting bribe of Rs. 2 lakh

लाचलुचपत विभागाने मोठी कारवाई केली असून यावेळी थेट तहसीलदारच अँटी करप्शनच्या जाळ्यात अडकला आहे. बुलढाण्यातील मातोळ्याचे तहसीलदार हेमंत पाटील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला आहे.
मंत्रिमंडळ निर्णय 16 सप्टेंबर 2025
शेतकऱ्याकडून दोन लाखांची लाच घेताना त्यांनी रंगेहात पकडण्यात आलं आहे. विशेष म्हणजे आपण अँटी करप्शनच्या ट्रॅपमध्ये अडकलो असे समजतात
तहसीलदाराने घेतलेली दोन लाख रुपयाची लाचेची रक्कम चक्क टॉयलेटमध्ये फ्लश केली. मात्र पथकाकडून त्याचा डॉ उधळण्यात आला आणि लाचेची रक्कम जप्त करण्यात आली.
आरक्षणाच्या रक्षणासाठी हजारो आदिवासी धडकले मुंबईच्या वेशीवर
गलेलट्ठ पगार असतानाही तहसीलदार सारखया पदावर बसलेल्या हेमंत पाटील सारख्या अधिकाऱ्यांना लाचखोरीची लागलेली चटक हा खूप गंभीर विषय आहे.
लाचेसाठी अनेकदा शेतकऱ्यांना नाडलं जात आहे. शेतकऱ्यांची अडवणूक केली जात आहे. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. बुलढाण्याच्या या शेतकऱ्याने धाडस दाखवत लाचलुपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करत
पोहरादेवी गडाच्या महंतांनी बंजारा आमदारांना दिला रोखठोक इशारा
या लाचखोर तहसीलदार हेमंत पाटीलला अद्दल घडवली आहे. असंच धाडस राज्यातील नागरीक आणि शेतकऱ्यांनी दाखवणं गरजेचं आहे.. त्याशिवास लाचखोर अधिकारी कर्मचाऱ्यांना चाप बसणार नाही.








