VIDEO;ट्रम्प यांचा भारतीयांना मोठा धक्का,आता भारतीयांना भरावे लागणार १ लाख डॉलर शुल्क

Trump's big blow to Indians, now Indians will have to pay a duty of 100,000 dollars

 

 

H-1B व्हिसा धारकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. अमेरिकेत नोकरी करु इच्छिणाऱ्या H-1B व्हिसा धारकांना आता यासाठी १ लाख डॉलर मोजावे लागणार आहे.

 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या व्हिसाशी संबंधित सर्व नियमही कडक केले आहेत. तसेच शुल्कातही मोठी वाढ केली आहे.

आमदाराचा पुतण्याच प्रतिआमदार बनून थेट सरकारी कार्यक्रमात

मात्र याचा थेट परिणाम भारतीय आयटी व्यावसायिकांवर होण्याची शक्यता आहे. कारण अमेरिकेत H-1B व्हिसा वापरणाऱ्यांमध्ये सर्वात जास्त भारतीयांचा समावेश आहे.

 

सुरुवातीला या H-1B व्हिसाचा उद्देश अमेरिकेत विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, गणित आणि आयटी क्षेत्रात काम कुशल कामगांराना ठेवणे होता.

महाराष्ट्रात मतचोरी फडणवीसांनी राजानीमा द्यावा – सपकाळ

पण गेल्या वर्षा या व्हिसामुळे देशांतर्गत अनेकदा टिकेचा सामना प्रशासनाला करावा लागला. अमेरिकेतील लोकांच्या मते, या व्हिसाचा गैरफायदा घेतला जात होता.

 

परदेशातून कमी पगारावर कर्मचारी आणले जात होते, यामुळे स्थानिक लोकांना नोकऱ्या मिळत नाहीत असा आरोप केला होता. ज्या कामांसाठी अमेरिकेतील कर्मचाऱ्यांना १ लाख डॉलर्स किंवा त्याहून अधिक पगार दिला जायचा, तो पगार H-1B व्हिसा कर्मचाऱ्याला केवळ ६० हजार डॉलर्स मिळायचा.

 

दरम्यान आता या H-1B व्हिसा नियमात बदल करण्यात आले असून याच्या शुल्कातही वाढ करण्यात आली आहे. व्हाइट हाउच अधिकारी विल शार्फ यांनी म्हटले की, H-1B प्रोगाम हा कुशल कर्मचाऱ्यांसाठी आहे,

सरकारच्या लेटरबॉम्बने लाडक्या बहि‍णींच्या अडचणी वाढणार

पण याचा गैरवापर होत आहे. यामुळेच शुल्कात वाढ करण्यात आली आहे. ज्यामुळे केवळ आवश्यक आणि कौशल्यपूर्ण व्यक्तींनाच संधी मिळेल.

 

अमेरिकेच्या वाणिज्य सचिव हॉर्वड लुटनिक यांनी सांगितले की, यापूर्वी अमेरिकेतील मोठ्या आयटी कंपन्या परदेशी कामगारांना प्रशिक्षण देऊन कामावर ठेवत होत्या.

डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला ड्रग्ज तस्करांच्या यादीत टाकले

मात्र आता यासाठी त्यांना सरकारला १ लाख अमेरिकन डॉलर्स द्यावे लागतील, आणि नंतर कर्मचाऱ्यांना त्यांना पगार देणे. पण आता या वाढलेल्या शुल्कामुळे या कंपन्या कमी पगारावर परदेशी लोकांना ठेवण्याचा विचार सोडतील आणि अमेरिकन तरुणांना नोकरीच्या जास्त संधी उपलब्ध होतील.

 

परंतु ट्रम्प प्रशासनाचा या निर्णयाचा फटका सर्वाधिक भारतीयांना बसण्याची शक्यता आहे. कारण अमेरिकेत H-1B व्हिसाधारकांमध्ये सर्वाधिक भारतीयांचा समावेश आहे.

 

, ७१% भारतीय अमेरिकेत या व्हिसाच्या आधारावर नोकऱ्या करतात. यामुळे आयटी क्षेत्रात काम करणाऱ्यांना सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता आहे. यामुळे भारतीयांचे अमेरिकेत नोकरीचे स्वप्न भंगणार आहे.

राज्यात पुढील दोन आठवडे जोरदार पाऊस

H1B व्हिसा हा परदेशी कर्मचाऱ्यांना अमेरिकच्या विशिष्ट कंपन्यांमध्ये नोकरी करण्याचा, अमेरिकेत व्यवसायांमध्ये संधी देतो. तीन वर्षांसाठी हा व्हिसा दिला जातो. सहा वर्षांपर्यंत वाढवण्याची यामध्ये सवलत असते.

अमेरिकेने H-1B व्हिसा शुल्कात प्रचडं वाढ केली असून या व्हिसा धारकांना आता १ लाख अमेरिकन डॉलर्सपर्यंत किंमत मोजावी लगाणार आहे.

भामटे बनावट आयकर अधिकाऱ्यांनी घरावर टाकला छापा
शुल्क वाढ केल्यामुळे या व्हिसाचा होणार गैरवापर कमी होईल, तसचे केवळ कुशल आणि आवश्यक कामगारांनाच नोकऱ्यांवर ठेवले जाईल ज्यामुळे अमेरिकन लोकांना नोकऱ्यांसाठी संधी उपलब्ध होईल.

 

 

Related Articles