युतीच्या चर्चांदरम्यान ठाकरे बंधूंचा मोठा निर्णय
Thackeray brothers' big decision during alliance talks

महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी घडामोड समोर आली आहे. मागील अनेक महिन्यांपासून ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात चर्चा रंगल्या असताना अखेर त्यावर शिक्कामोर्तब झाल्याचं समजत आहे.
एकनाथ शिंदे यांचे X अकाऊंट हॅक, पाकिस्तान-तुर्किचे झेंडे
सूत्रांच्या माहितीनुसार, मुंबईतील महानगरपालिका निवडणुकांसाठी शिवसेना (यूबीटी) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यातील जागावाटपाचा फॉर्म्युला अखेर ठरला आहे.
मनसे आणि शिवसेना बालेकिल्ल्यात समान जागा वाटून घेणार आहे. दरम्यान उर्वरित महानगरासाठी 60:40 चा फॉर्म्युला स्वीकारण्याची शक्यता आहे अशी सूत्रांची माहिती आहे.
ई-केवायसी करताना लाडक्या बहिणींना तांत्रिक फटका; लिंक सर्व्हर डाऊन
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती होणार हे आता जवळपास निश्चित झालं असून फक्त औपचारिक घोषणा होणं बाकी आहे. दरम्यान महापालिका निवडणुकीसाठी दोन्ही पक्षाच्या नेत्यांना जागांच्या यादी तयार करण्यास सांगण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आपल्या युतीची अधिकृत घोषणा कधी करणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. दरम्यान सूत्रांच्या माहितीनुसार, शिवसेना (यूबीटी) आणि मनसे यांच्यातील औपचारिक युती दिवाळीच्या आसपास जाहीर होऊ शकते,
नवीन GR मुळे 50 लाख मराठा ओबीसीमध्ये
जेव्हा महापालिका निवडणुकीचा पहिला टप्पा होण्याची शक्यता आहे. तसंच शिवाजी पार्कवर होणाऱ्या दसरा मेळाव्यातही ही घोषणा केली जाऊ शकते असं बोललं जात आहे.
राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला आदेश दिला आहे. 31 जानेवारी 2026 पर्यंत निवडणूक घेण्याचा आदेश दिला आहे.
महायुतीत तणाव;शिंदे गटाच्या नेत्याने भाजपाच्या बड्या नेत्याला कोर्टात खेचले
राज्य निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टात जानेवारी अखेरपर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. सुप्रीम कोर्टाने यादरम्यान 4 आठवड्यात लागणारा स्टाफ त्यांना द्या, नोव्हेंबर 2025 पर्यंत लागणाऱ्या सगळ्या EVM मशिन्स द्या असाही आदेश दिला आहे.
4 आठवड्यात लागणारा स्टाफ आणि नोव्हेंबर 2025 पर्यंत लागणाऱ्या सगळ्या EVM मशिन्स द्या असा आदेश कोर्टाने दिला आहे. इतर मशिन्स इतर राज्यातून घेण्यासाठी ऑर्डर दिली आहे अशी माहिती यावेळी देण्यात आली.
मोदींवर काँग्रेसची टीका …मग गेली आठ वर्ष लूट महोत्सव सुरु होता का?
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. यावेळी राज्य सरकारच्या वकिलांनी सुनावणीच्या सुरुवातीला सांगितलं की, 65 हजार मशिन्स आहेत, 55 हजार मशिन्स आणखी हव्यात. यावर याचिकाकर्त्याच्या वकिलांनी हा सगळा वेळकाढूपणा सुरू आहे असं सांगितलं.
एवढा उशीर करण्याची काहीही गरज नव्हती. याचिकाकर्ते असंच करत राहिले तर निवडणुका 2026 पर्यंत पण हे करणार नाहीत असा दावा याचिकाकर्त्याच्या वकिलांनी केला. यावर्षी निवडणुका होऊ शकल्या नाहीत,
मराठवाड्यात पुन्हा ढगफुटी सदृश्य पावसाने हाहाकार
कारण ओबीसी आणि इतर प्रकरणं आली असं राज्य सरकारकडून सांगण्यात आलं. कोर्टाने यावेळी आम्हाला चार महिन्यात निवडणुका व्हाव्यात अशी अपेक्षा होती असं सांगितलं. आम्हाला वाटत होतं की या महिन्याच्या शेवटी निवडणुका होतील असंही कोर्टाने म्हटलं.








