मंत्रिमंडळ निर्णय ;शेतकऱ्यांसाठी 2100 कोटी रुपयांची मदत जाहीर
Cabinet decision; Rs 2100 crore aid announced for farmers

दिवसापासून राज्यात मुसळधार पाऊस पडत आहे. या मुसळधार पावसामुळे अतिवृष्टी आणि वादळामुळे मराठवाड्यासह विविध भागातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला ड्रग्ज तस्करांच्या यादीत टाकले
या पावसामुळे शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास मातीमोल झाला असून बळीराजावर संकट कोसळलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून तातडीने मदतीची मागणी करण्यात आली.
या पार्श्वभूमीवर आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून २१०० कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आज (23 सप्टेंबर) झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी घोषणा करण्यात आली आहे.
नवीन GR मुळे 50 लाख मराठा ओबीसीमध्ये
ही रक्कम कधीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केली जाते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या मंत्रिमंडळ बैठकीत इतरही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत.
सीना नदीने धारण केले रौद्ररूप; महापूर आल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, नदीकाठच्या गावांना…
(आरोग्य विभाग)
शासकीय रुग्णालयांच्या सक्षमीकरणासाठी, तसेच राज्य आरोग्य हमी सोसायटीला राखीव निधी मिळणार. विस्तारित महात्मा फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत – जन आरोग्य योजनेतून रुग्णाच्या उपचाराच्या दाव्यातून मिळणाऱ्या निधीचा विनियोग करण्यास मंजुरी.
महायुतीत तणाव;शिंदे गटाच्या नेत्याने भाजपाच्या बड्या नेत्याला कोर्टात खेचले
(परिवहन विभाग)
नागपूर-नागभीड रेल्वे ब्रॉडगेजच्या कामाला गती. या १९६.१५ कि.मी. नॅरोगेज मार्गाचे ब्रॉडगेज मधील रुपांतरणाच्या कामासाठी ४९१ कोटी ५ लाख रुपये खर्चाच्या तरतुदीस मान्यता.
(महसूल विभाग)
अकोल्यात शहर बस स्थानक, भाजी बाजार आणि वाणिज्य संकुलाला जागा. मौजे अकोला येथील २४ हजार ५७९.८२ चौ.मी. जागा महापालिकेला हस्तांतरित करण्यास मंजुरी.
युतीच्या चर्चांदरम्यान ठाकरे बंधूंचा मोठा निर्णय
(महसूल विभाग)
सोलापूर जिल्ह्यातील मौजे कुंभारी (ता. दक्षिण सोलापूर) येथील कॉ. मिनाक्षीताई साने महिला विडी कामगार सहकारी गृहनिर्माण संस्थेने विकासककाच्या माध्यमातून बांधलेल्या घरांसाठी मुद्रांक व नोंदणी शुल्कात सवलत.
(महसूल विभाग)
वसई विरार शहर महानगरपालिकेस मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटलच्या इमारतीसाठी आचोळे ( ता. वसई, जि. पालघर) येथील जमीन देण्यास मंजुरी.
एअर इंडियाचे विमान हायजॅक करण्याचा प्रयत्न? 9 जणांना अटक
(महसूल विभाग)
महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा, नाशिकरोड यांना मौजे देवळाली (ता.जि. नाशिक ) येथील १०५५.२५ चौ.मी. जमीन देण्यास मान्यता.
(गृह विभाग)
मुंबईमधील घाटकोपर येथे बेकायदेशीर फलक कोसळून झालेल्या दुर्घटनेच्या उच्च स्तरीय चौकशीसाठी स्थापन न्यायमूर्ती श्री. दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखालील समितीचा अहवाल, शिफारशींसह स्वीकारला. तसेच अहवालातील निष्कर्ष, समितीने सुचविलेल्या उपाययोजनांवरील कार्यवाहीचा कृती अहवाल स्वीकारला. यावर संबंधित विभागांना एक महिन्याच्या मुदतीत कार्यवाही करण्याचे निर्देश.
युवा नेते अब्दुल वाजेद पठाण यांचा कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी शरद पवार पक्षात प्रवेश
(गृहनिर्माण विभाग)
मुंबईतील अंधेरी येथील सरदार वल्लभभाई पटेल नगर (एसव्हीपी नगर) येथे म्हाडाच्या माध्यमातून सामुहिक पुनर्विकास प्रकल्प राबवणार. याठिकाणच्या १२२ संस्थांच्या, तसेच ३०७ वैयक्तिक भुखंडावरील ४ हजार ९७३ सदनिकांच्या पुनर्विकासाचा प्रस्ताव








