1.4 कोटी लोकांचे आधार कार्ड अचानक झाले बंद

Aadhaar cards of 1.4 crore people suddenly closed

 

 

तुमच्या आधार कार्डसंदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर येतेय. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI)ने देशातील 1.4 कोटीहून अधिक आधार क्रमांक निष्क्रिय केले आहेत.

 

UIDAIने उचललेले हे पाऊल सरकारच्या क्लिन-अप ड्राइव्ह मोहिमेचा एक भाग आहे. मागील वर्षातच हे सुरू करण्यात आले असून सरकारी योजनांचा लाभ योग्य व्यक्तींना घेता यावा यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे.

राज्यावर पाच दिवस पावसाचं मोठे संकट

UIDAIने निष्क्रिय केलेले आधार क्रमांक हे मयत व्यक्तींचे आहे. मयत व्यक्तींच्या नावे कोणताही चुकीचा दावा करण्यात येऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

 

टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, UIDAIचे सीईओ भुवनेश कुमार यांनी म्हटलं आहे, मृत पावलेल्या व्यक्तीचे आधार नंबर डिअॅक्टिव्हेट करणे गरजेचे आहे. जेणेकरुन कल्याणकारी योजनांची विश्वासार्हता टिकून राहण्यासाठी व कोणाच्या क्रमांकाचा दुरुपयोग होऊ नये.

 

सुप्रीम कोर्टाचा निर्णय;आता सार्वजनिक ठिकाणी पुतळे उभारण्यास बंदी
सध्या आधारकार्ड 3,300पेक्षा जास्त सरकारी योजनांशी जोडले गेले आहे. UIDAIचे लक्ष्य डिसेंबर 2025पर्यंत असून तब्बल 2 कोटी मृत लोकांचे आधार नंबरवर निष्क्रिय करण्यात आले आहेत.

 

UIDAIअधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अभियानातील सगळ्यात मोठी अडचण म्हणजे मृत्यूदाखल्यासाठी आधार क्रमांक अनिवार्य नाहीये. त्यामुळं डेटा मिळवण्यात अडचणी येत आहेत.

आता Ph,D साठी UGC चे नवे नियम

अनेक ठिकाणी तर आधार क्रमांक एकतर मृत्यूच्या नोंदींमध्ये नोंदवला जात नाही किंवा चुकीचा किंवा अपूर्णपणे नोंदवला जातो. शिवाय, डेटा विविध वित्तीय आणि गैर-वित्तीय संस्थांमध्ये विखुरलेला असतो, ज्यामुळे पडताळणी आणि समेट करणे अत्यंत कठीण होते.

 

यापूर्वी, मृत व्यक्तींच्या नावे सरकारी लाभ जारी केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. या समस्येचे निराकरण करण्यासाठी UIDAI सतत मोहीम राबवत आहे.

गेरु आणि केमिकल्सपासून बनवलेले दोन ट्रक नकली बटाटे जप्त

UIDAI ने नागरिकांना MyAadhaar पोर्टलवर मृत्यूची नोंद करण्याचे आवाहन केले आहे. CEO कुमार म्हणाले, “लाखो लाभार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी अचूक डेटाबेस राखणे आवश्यक आहे आणि भारताची डिजिटल ओळख प्रणाली आणखी मजबूत करेल.”

 

 

Related Articles