राज्यसभेच्या ५ जागांसाठी निवडणूक जाहीर
Elections announced for 5 Rajya Sabha seats

भारतीय निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या ५ जागांच्या पोटनिवडणुकीच्या तारखेची बुधवारी घोषणा केली. पंजाबमधील एक आणि जम्मू-काश्मिरमधील ४ रिक्त जागांसाठी पोटनिवडणुका होणार आहेत.
परभणीतील ख्वाजा युनूस मृत्यू प्रकरणात दोषी सचिन वाझेला कोर्टाचा झटका
पुढील महिन्यात म्हणजे २४ ऑक्टोबरला या जागांसाठी मतदान होणार आहे. खासदार संजीव अरोरा यांच्या राजीनाम्यामुळे पंजाबची राज्यसभेची जागा रिक्त झाली होती.
तर जम्मू-काश्मीरमधील ४ जागा फेब्रुवारी २०२१ पासून रिक्त होत्या. निवडणूक आयोगाने बुधवारी अधिसूचना जारी करून पोटनिवडणुकीची घोषणा केली.
आदिवासी संघटनांच्या आंदोलनाला हिंसक वळण ,वाहनांची तोडफोड, दगडफेक
पोटनिवडणुकीची अधिसूचना ६ ऑक्टोबर २०२५ रोजी जारी केली जाणार आहे. १३ ऑक्टोबरपर्यंत नामांकन अर्ज दाखल केले जातील. १६ ऑक्टोबरपर्यंत नामांकन अर्ज मागे घेता येणार आहे.
२४ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान होईल आणि २४ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होईल. त्यानंतर नवीन राज्यसभा खासदारांची घोषणा केली जाईल.
मान्सून कधी परतणार ? हवामान विभागाची महत्वपूर्ण माहिती
संजीव अरोरा यांच्या राजीनाम्यानंतर पंजाबच्या राजकीय वर्तुळात चर्चा होती की, अरविंद केजरीवाल किंवा मनीष सिसोदिया यांना पंजाबमधून राज्यसभेवर पाठवले जाऊ शकते.
अरविंद केजरीवाल यांनी काही दिवसांपूर्वी खासदारकीची निवडणूक लढवण्यास नकार दिल्याने या चर्चेला पूर्णविराम मिळाला.
राहुल गांधींच्या दणक्याने निवडणूक आयोगाची झिंग उतरली ;घेतला मोठा निर्णय
पक्षाची राजकीय व्यवहार समिती राज्यसभेवर कोणाची निवड करायची हे ठरवेल. जम्मू आणि काश्मीरमधील चारही जागा फेब्रुवारी २०२१ पासून रिक्त आहेत.







