थेट भाजप नेत्याच्याच घरी ईडीचा छापा

ED raids BJP leader's house

 

 

भाजप कार्यकर्ते प्रफुल्ल लोढा यांच्या जामनेर, जळगाव तसेच फत्तेपूर येथील मालमत्ताची ईडीच्या पथकाकडून तपासणी दहा ते पंधरा कर्मचाऱ्यांचे पथक जळगाव जिल्ह्यात दाखल झाले.

मान्सून कधी परतणार ? हवामान विभागाची महत्वपूर्ण माहिती

प्रफुल्ल लोढा यांच्या मालमत्ता संदर्भातील कागदपत्रांसह वेगवेगळ्या बाबींची चौकशी सुरू आहे. पथकाकडून पहाटेपासून प्रफुल्ल लोढा यांचे जामनेर येथील निवासस्थान, त्यांच्या मुलाचे जळगाव येथील निवासस्थान तसेच फत्तेपूर येथील मालमत्तांची तपासणी केली जात आहे

 

प्रफुल्ल लोढा यांच्या संदर्भात ते मालमत्तांची कागदपत्र यासह विविध गोष्टींची तपासणी करण्यात आली. सकाळी 6 ते रात्री 8 अशी जवळपास 13/14 तासांहून अधिक ईडीच्या पथकाकडून जामनेर येथील निवासस्थानी तपासणी करण्यात आली.

पाहा VIDEO;समीर वानखेडेंची ‘बॅड्स ऑफ बॉलीवूड’ वर २ कोटींचा मानहानीचा दावा

जळगाव ब्रेक जळगावातील भाजपचे कार्यकर्ते प्रफुल्ल लोढा यांच्या जामनेर साहेब इतर ठिकाण, मालमत्तांवर आज ईडीने छापा टाकून तपासणी केली. सकाळी 6 ते रात्री 8 अशी जवळपास 13/14 तासांहून अधिक ईडीच्या पथकाकडून जामनेर येथील निवासस्थानी तपासणी करण्यात आली.

 

ईडीचे दहा ते पंधरा अधिकाऱ्यांचे पथकांच्या माध्यमातून केंद्रीय राखीव बलाचे शस्त्रधारी यांच्या बंदोबस्तात ही तपासणी करण्यात आली. प्रफुल्ल लोढा यांच्या तसेच त्यांच्या पत्नी मुलगा, सून यांच्या जामनेर,

मराठा समाज हा सामाजिक दृष्ट्या मागास नाही ;भुजबळ

जळगाव फत्तेपूर येथील मालमत्तांची ..कागदपत्र, तसेच विविध गोष्टीची ईडी पथकाकडून तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर काही कागदपत्र, दस्तऐवज घेऊन ईडीचे पथक रवाना झाल्याचे माहिती मिळाली आहे.

 

प्रफुल्ल लोढा यांच्या विरुद्ध मुंबईत महिला अत्याचार तसेच हनी ट्रॅप संदर्भात गुन्हे दाखल असुन ते कारागृहात आहेत.. आता इडीकडून प्रफुल्ल लोढा

मराठवाड्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये द्या;उद्धव ठाकरे

यांच्या जळगाव जिल्ह्यातील मालमत्तांची चौकशी तसेच तपासणी करण्यात आल्याचे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.. ईडी ने केलेल्या चौकशीत नेमके काय गोष्टी तसेच खुलासे समोर येतात, हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

 

 

 

Related Articles