राहुल गांधी मराठवाड्याच्या दौऱ्यावर ,भाजपने साडी नेसवलेल्या मामा पगारेंचा करणार सन्मान
Rahul Gandhi on his visit to Marathwada, BJP will honor Mama Pagar who dressed him in a saree

राज्यातील पूरग्रस्त पीडित शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांपासून ते अनेक मंत्र्यांनी दौरे सुरू केले आहेत. तसेच, काहीजण आपल्या परीने मदतीचाही हात आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्ली दौऱ्यावर असून राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्राकडे मदतीची मागणी करणार आहेत, तर, काँग्रेस नेते आणि लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी मराठवाडा दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे.
मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाचा दौरा करण्याची शक्यता असून दसऱ्या आधीच राहुल गांधी मराठवाड्यातील पूरग्रस्त पीडितांची भेट घेऊ शकतात, अशी माहिती सुत्रांनी दिली.
तसेच, आपल्या दौऱ्यात कल्याणमधील साडी प्रकरणातील जेष्ठ कार्यकर्त्याची भेट घेऊन काँग्रेसच्यावतीने त्यांचा सन्मानही केला जाणार असल्याचे समजते.
कल्याणमधील काँग्रेस ज्येष्ठ पदाधिकारी मामा पगारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केली होती. ही पोस्ट त्यांना कोणी तरी पाठविली होती,
ती त्यांनी पुढे फॉरवर्ड केली. त्यामुळे, पगारे यांनी पंतप्रधान मोदी यांचा अपमान केल्याचे सांगत भाजपचे जिल्हाध्यक्ष नंदू परब आणि पदाधिकारी संदीप माळी यांना पगारे यांना भररस्त्यात गाठून साडी नेसविली होती.
या घटनेवरुन काँग्रेस आणि भाजप आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं. भाजप पदाधिकाऱ्यांनी भररस्त्यात साडी नेसवून अवमान केल्यानंतर मामा पगारे हे रुग्णालयात उपचार घेत आहेत.
विशेष म्हणजे रुग्णालयात असताना गुरुवारी राहूल गांधी यांनी मामा पगारेंशी संवाद साधला. मामा तुम्ही घाबरु नका, काँग्रेस तुमच्यासोबत आहे. आम्हाला तुमच्याबद्दल बाळासाहेब थोरातांनी माहिती दिली आहे.
50 वर्षापासून तुम्ही काँग्रेसचे कार्यकर्ते आहात, तुमचा खूप आदर आहे, अशा शब्दात राहुल गांधींनी मामा पगारे यांना धीर दिला. तसेच, लवकरच भेट घेणार असल्याचे आश्वासनही दिले.
त्यानंतर, आता राहुल गांधी मराठवाडा दौऱ्यासाठी महाराष्ट्रात येत असल्याची माहिती असून याच दौऱ्यात ते मामा पगारे यांचीही भेट घेणार आहेत.
दरम्यान. राज्यात गेल्या काही दिवसांत झालेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं असून बळीराजाची शेती पाण्याखाली गेली आहे.
कित्येक शेतातील मातीही पिकांसोबत वाहून गेल्याने जगावं कसं, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. आता, हा बळीराजा सरकारकडे अपेक्षा लावून बसलाय.
काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते मामा पगारे यांना साडी नेसविल्याचे प्रकरण समोर आले असून भाजप पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब, भाजप पदाधिकारी संदीप माळी, दत्ता मयेकरसह 18 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. टिळकनगर पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला असून ॲट्रॉसिटी दाखल न झाल्याने आपण कोर्टात दाद मागणार असल्याचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी म्हटलं.
डोंबिवलीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रकाश उर्फ ‘मामा’ पगारे यांना भाजप कार्यकर्त्यांनी साडी नेसवून सार्वजनिक ठिकाणी निषेध केला. ही घटना पगारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मॉर्फ केलेला व्हिडिओ फेसबुकवर पोस्ट केल्यानंतर घडली.
मामा पगारे यांनी मोदींचा साडी नेसलेला मॉर्फ केलेला फोटो बनवला होता. सोमवारी पगारे यांनी व्हिडिओ पोस्ट करत ‘माफ करा मुलींनो, मलाही ट्रेंडमध्ये राहायचे आहे’ असे कॅप्शन दिले होते.
ही क्लिप लोकप्रिय मराठी गाण्यावर सेट केली गेली होती, ज्यावरून भाजपच्या कल्याण जिल्हा युनिटकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या.
या पोस्टवर भाजपच्या कल्याण जिल्हा युनिटकडून लगेचच तीव्र प्रतिक्रिया आल्या, ज्यांनी पगारे यांनी पंतप्रधानांचा अपमान केल्याचा आरोप केला. ‘योग्य उत्तर देण्याचे’ ठरवत, स्थानिक भाजप नेत्यांनी स्वतःचा प्रतीकात्मक निषेध केला.
पगारे हे डोंबिवली (पूर्व) येथील मानपाडा रोडजवळ सकाळी वेळ घालवतात अशी माहिती मिळाल्यावर, जिल्हा भाजप प्रमुख नंदू परब, मंडळ अध्यक्ष करण जाधव आणि संदीप माळी
आणि दत्ता मालेकर यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी मंगळवारी सकाळी त्यांच्याशी सामना करण्यासाठी आले. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी पगारे यांना जबरदस्तीने साडी घालून इशारा दिला.
व्हिडिओमध्ये दिसते की, पांढरा कुर्ता-पायजमा आणि काळ्या बूट घातलेले पगारे यांना भाजप कार्यकर्त्यांनी पकडले. त्यानंतर त्यांना स्थानिक कापडाच्या दुकानातून 5 हजार रुपयांची साडी घेऊन जबरदस्तीने घालण्यात आली.
स्थानिक पत्रकारांशी बोलताना नंदू परब यांनी सांगितले की, ‘जर कोणी सोशल मीडियावर आमच्या वरिष्ठ नेत्यांचा अनादर केला, तर आम्ही योग्य उत्तर देऊ. आज पगारे यांना सार्वजनिकरित्या याचा सामना करावा लागला.’








