मोदी सरकारला आव्हान देणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना अटक
Social activist Sonam Wangchuk arrested for challenging Modi government
लडाखची राजधानी लेहमध्ये झालेल्या हिंसाचारा प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना आज शुक्रवारी अटक करण्यात आली आहे. सोनम वांगचुक सरकारच्या रडारवर आहेत.
कालच सोनम वांगचुक यांच्या स्टूडेंट्स एजुकेशनल अँड कल्चरल मूवमेंट ऑफ लडाख (एसईसीएमओएल) एफसीआरए लायसन्स रद्द करण्यात आलं होतं. वांगचुक यांना लेह हिंसाचार प्रकरणात अटक करण्यात आली आहे.
मराठा समाज हा सामाजिक दृष्ट्या मागास नाही ;भुजबळ
काल गुरुवारी केंद्रशासित प्रदेश लडाखमध्ये गुरुवारी तणावपूर्ण शांतता होती. या दरम्यान पोलीस आणि अर्धसैनिक बलांनी लेह शहरात कठोरतेने कर्फ्यू लागू केला.
दोन दिवसांपूर्वी लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी विरोध प्रदर्शन झालं होतं. त्यावेळी अचानक हिंसाचार झालेला. यात चौघांचा मृत्यू झाला. 90 जण जखमी झाले होते.
थेट भाजप नेत्याच्याच घरी ईडीचा छापा
लेह एपेक्स बॉडी तर्फे (LAB) लडाखला सहाव्या अनुसूची विस्तार आणि राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी दोन दिवसांपूर्वी बुधवारी बंद बोलवण्यात आला होता.
त्यावेळी भडकलेल्या हिंसाचाराप्रकरणी 50 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. कारवाई संदर्भात पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, कर्फ्यूवाल्या भागात सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. कुठे काही अप्रिय घडलेलं नाही.
या दरम्यान लेहचे जिल्हा मॅजिस्ट्रेट रोमिल सिंह डोनक यांनी गुरुवारी पुढचे दोन दिवस सरकारी आणि खासगी शाळा, कॉलेजेस आणि अन्य शिक्षण संस्था बंद ठेवण्याचे आदेश दिले. या दरम्यान अंगणवाडी केंद्र सुद्धा बंद राहणार आहेत.
पाहा VIDEO;समीर वानखेडेंची ‘बॅड्स ऑफ बॉलीवूड’ वर २ कोटींचा मानहानीचा दावा
लेह हिंसाचार वाढल्यामुळे सोनम वांगचुक यांना आठवड्याभरापासून सुरु असलेलं उपोषण मध्येच सोडावं लागलं. उपोषणादरम्यान त्यांनी या हिंसाचाराची निंदा केली होती.
राहुल गांधी मराठवाड्याच्या दौऱ्यावर ,भाजपने साडी नेसवलेल्या मामा पगारेंचा करणार सन्मान
त्यांनी हिंसाचारावर टीका केलेली. “हा लडाखचा सर्वात दु:खद दिवस आहे. मागच्या पाच वर्षांपासून आपण ज्या मार्गावर चालत होतो, तो शांततामय मार्ग होता” असं सोनम वांगचुक म्हणाले








