ST बस ची दहा टक्के भाडेवाढ
ST bus fare hiked by 10 percent

सध्याचा काळ हा सणासुदीचा आहे. लवकरच दिवाळी हा सण येणार आहे. दिवाळी तोंडावर आली आहे. मात्र दिवाळीत प्रवास करणे आता सर्वसामान्यांना अवघड जाणार आहे.
आता रेल्वेने विदेशातही जात येणार ,सरकारचा मोठा निर्णय
कारण एसटी प्रशासनाने दिवाळीआधी तिकीट दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. एसटीच्या दरवाढीचा फटका प्रवाशांना बसणार आहे.
एसटीच्या तिकीट दरात वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसणार आहे. ही दरवाढ दिवाळीसाठी लागू असणार आहे.
या 10 जिल्ह्यांना थेट इशारा, घराबाहेर पडणे टाळा
एसटीच्या तिकीट दरामध्ये तब्बल 10 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे बाहेरगावी राहणाऱ्या लोकांना दिवाळीत घरी जाण्यासाठी जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने एसटीच्या तिकीट दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. दिवाळीत नागरिक मोठ्या प्रमाणात आपल्या गावी जातात.
तिकीट दरात 10 टक्के वाढ करण्यात आली आहे. दिवाळीत एसटीचे दर वाढल्याने लोकांच्या खिशाला आता कात्री बसणार आहे. शिवनेरी आणि शिवाई या बससाथी जुनेच दर लागू असणार आहेत.
चिंता वाढल्या;15 ऑक्टोबर पर्यंत पाऊस पाठ सोडणार नाही
15 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर दरम्यान ही तिकीट वाढ लागू असणार आहे. त्यामुळे आता सणसुदीच्या काळात लोकांना जादा पैसे मोजावे लागणार आहेत.
एसटी कर्मचारी कृती समितीने दिवाळीच्या तोंडावर आंदोलनाचा इशारा दिला आहे. प्रलंबित मागण्यासाठी कृतिसमितीने पुन्हा एकदा एल्गाराचे हत्यार उपसले आहे.
मागण्या मान्य न झाल्यास १३ ऑक्टोबरपासून आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे. कृती समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. वाढीव फरक लवकर द्या, अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे.
या देशाने केले देशभरात इंटरनेट बंद; नागरिकांचे हाल
दिवाळीसारख्या सणासुदीच्या काळात ग्रामीण महाराष्ट्र पुन्हा एकदा वाहतुकीच्या संकटात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण एसटी कर्मचाऱ्यांनी दिवाळीपूर्वी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
गेल्या काही वर्षांत एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना प्रचंड हाल सोसावे लागले आहेत. आजही एसटी बस हीच प्रवासाचं प्रमुख साधन मानलं जातं.
मुख्यमंत्री फडणवीसांचा ओला दुष्काळ जाहीर करण्यास नकार; पण…..
खेड्यातील विद्यार्थ्यांपासून शेतकऱ्यांपर्यंत आणि कामगारांपासून गृहिणींपर्यंत बहुसंख्य लोकांची रोजीरोटी ही एसटीवर अवलंबून आहे. त्यामुळे हा संप प्रत्यक्षात आला तर ग्रामीण महाराष्ट्राचं दैनंदिन जीवन विस्कळीत होईल,
अशी चिंता व्यक्त केली जात आहे. तीन वर्षांपूर्वी दिवाळीच्या काळात जवळपास महिनाभर एसटी कर्मचारी संपावर होते. त्या काळात प्रवाशांना खासगी वाहनांवर अवलंबून राहावं लागलं होतं.








