मनोज जरांगे पाटलांची तब्येत बिघडली

Manoj Jarange Patil's health deteriorated

 

 

 

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची तब्येत अचानक बिघडली आहे, त्यांना उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरमधील

 

एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार मनोज जरांगे पाटील हे व्हायरल तापाने त्रस्त आहेत

मुख्यमंत्री फडणवीसांचा ओला दुष्काळ जाहीर करण्यास नकार; पण…..

दरम्यान उद्या मनोज जरांगे पाटील यांचा नारायण गड येथे दसरा मेळावा होणार आहे. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावं यासाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाची हाक दिली होती,

 

मुंबईमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण केलं, लाखोच्या संख्येनं मराठा बांधव या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. जरांगे पाटील यांच्या या आंदोलनाला मोठं यश मिळालं आहे,

यंदाचं मान्सून संपला ! ,भारतीय हवामान विभागाची घोषणा

राज्यात हैदराबाद गॅझेट लागू करण्यात आलं आहे. राज्यात हैदराबाद गॅझेट लागू झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांचा हा पहिलाच दसरा मेळावा असणार आहे, त्यामुळे ते या मेळाव्यात काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

 

मात्र आज त्यांची अचानक तब्येत बिघडली आहे. त्यामुळे ते उद्याच्या दसरा मेळाव्याला हजर राहणार की नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात असतानाच आता जरांगे पाटील यांनी स्वत: स्पष्ट केलं आहे.

 

ते उद्याच्या दसरा मेळाव्याला नारायण गड येथे जाण्यावर ठाम आहेत. अ‍ॅब्युलन्समधून जाणार मात्र दसरा मेळाव्याची परंपरा मोडणार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

हवामान विभागाने दिले ऑक्टोबरमध्ये नव्या संकटाचा इशारा

उद्या नारायण गड येथे मनोज जरांगे पाटील यांचा दसरा मेळावा होणार आहे, आजारी असलो तरी दसरा मेळाव्याला जाणार असं त्यांनी स्पष्ट केलं आहे,

 

दरम्यान राज्यात हैदराबाद गॅझेट लागू झाल्यानंतर जरांगे पाटील यांचा हा पहिलाच मेळावा आहे, राज्यात सध्या मराठा विरोधात ओबीसी असं वातावरण निर्माण झालेलं आहे.

तुरुंगात माजी मंत्र्यावर जीवघेणा हल्ला

या सर्व पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील काय बोलणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार असून, या मेळाव्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लांगलं आहे.

 

 

Related Articles