लोकसभेच्या उमेदवारीवरून ठाकरे गटाच्या दोन नेत्यांमध्ये जुंपली

Two leaders of the Thackeray group clashed over Lok Sabha candidature ​

 

 

 

 

आगामी लोकसभा निवडणुकांसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. अशातच, छत्रपती संभाजीनगर लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनीही आपल्या इच्छा जाहीरपणे व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.

 

 

यंदाची निवडणूक चुरशीची ठरणार आहे ती, शिवसेनाआणि राष्ट्रवादीत पडलेल्या अंतर्गत फुटीमुळे. अशातच ठाकरे गटाचे नेते, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे

 

 

दोघेही आगामी लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याची माहिती मिळत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही नेते छत्रपती संभाजीनगरमधून लोकसभेची निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचं बोललं जात आहे.

 

 

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे बोलताना म्हणाले की, “शिवसैनिक असताना पक्षप्रमुख जो आदेश देतील, तो मान्य असेल. पक्षप्रमुखांनी सांगितलं लढायचं, तर लढायचं,

 

 

पक्षप्रमुखांनी सांगितलं नाही लढायचं, तर नाही लढायचं. तसेच, पक्षप्रमुखांनी सांगितलं की, संघटनेचं काम करायचं, तर करायचं. हा आदेश मानणारा मी शिवसैनिक आहे. त्यामुळे आदेश मानणारा मी शिवसैनिक आहे.”

 

 

 

“मी शिवसैनिक आहे. पक्षप्रमुख जिथे सांगतील तिथे लढण्याची माझी तयारी आहे. कुठेही लढायला सांगितलं तरी, केवळ निवडणूक नाही, इतर कोणतीही लढाई लढायला सांगितली तरी ती लढाई लढण्याची माझी 100 टक्के तयारी आहे.”, असं अंबादास दानवे म्हणाले.

 

 

 

तसेच ते पुढे बोलताना जर तुम्हाला संभाजीनगरातून निवडणूक लढवायला सांगितली, तर लढवणार का? यावर बोलताना ते म्हणाले की, “मी मागच्या 10 वर्षांपासून निवडणूक लढण्यास इच्छुक आहे.”

 

 

अंबादास दानवेंना निवडणूक लढवण्याची इच्छा होती. त्यामुळे गेल्या निवडणुकीत माझा पराभव झाला आहे. असा आरोप ठाकरे गटाचे नेते आणि माजी आमदार चंद्रकांत खैरे यांनी केला आहे.

 

 

 

ते बोलताना म्हणाले की, “इच्छा असली, तर माझी इच्छा मुख्यमंत्री व्हायची आहे. मग याचा अर्थ मी इतरांना पाडायचं आणि त्या पदावर जाऊन बसायचं का? असं नाही.

 

 

नशीबातही हवं. एकदा मी आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे भेटलो होतो. त्यावेळी ते म्हणाले की, अरे आपल्या नशीबातही हवं,

 

 

नशीबात असेल तर मिळतं. आज तुला मला मंत्रिपद द्यायचं नाही, पण असं काही घडून आलं तर मला तुला मंत्रिपद द्यावं लागेल, असं बाळासाहेब म्हणाले होते. नशीबाची गोष्ट असते. .

 

 

 

संभाजीनगरची जागा कोण लढवणार? असा प्रश्न चंद्रकांत खैरेंना विचारल्यावर चंद्रकांत खैरे म्हणाले की, “छत्रपती संभाजीनगरची निवडणूक

 

 

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सांगतील ते लढवणार. होईन ना चांगलं. कशाला काळजी करायची. जनतेची जी इच्छा आहे, ती उद्धव ठाकरे मान्य करतील.”

 

 

लोकसभा निवडणूक लढवण्यावरुन ठाकरे गटातील दोन नेते अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे ( यांच्यामध्ये तू-तू मै-मै सुरु झाल्याचं पाहायला मिळत आहे.

 

 

महाविकास आघाडीत जागा वाटपावरून अजूनही एकमत झालेलं नाही. त्यापूर्वीच छत्रपती संभाजी नगरमध्ये ठाकरे गटातून कोण निवडणूक लढवणार यावरून चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्या कुरघोडी पाहायला मिळत आहे.

 

 

लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजलं नसलं तरीही छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून कोण निवडणूक लढवणार यावरून ठाकरे गटात वादाच बिगुल वाजलंय.

 

 

त्यातच जुने मित्र संजय शिरसाठ यांनी या वादाला फोडणी दिली असून संभ्रम देखील निर्माण केलाय. चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे दोघेही लोकसभा निवडणूक लढवतील मात्र कोण कोणत्या पक्षाकडून लढवतील हे सांगण कठिण असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

 

 

 

लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी हे आहेत इच्छुक उमेदवार ;
इम्तिताज जलील,खासदार,
भागवत कराड,केंद्रीय अर्थराज्यमंत्रीभाजप,
अतुल सावे गृहनिर्माण मंत्री भाजप
संदिपान भुमरे रोहयो मंत्री शिंदे गट
अंबादास दानवे विरोधी पक्षनेते ठाकरे गट
चंद्रकांत खैरे नेते ठाकरे गट
विनोद पाटील मराठा आरक्षण याचिकाकर्ते

 

तब्बल पाच मंत्री आणि एक विरोधी पक्षनेता असलेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याने राज्याच्या राजकारणात नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

 

 

प्रत्येक निवडणुकीत संभाजीनगरमध्ये आपली सत्ता यावी यासाठी सर्वच पक्ष आपली ताकद पणाला लावतात. मात्र यंदाच्या लोकसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाला संभाजीनगरची जागा सुटणार यापेक्षा कोणता उमेदवार लोकसभेच्या रिंगणात उतरणार याची अधिक चर्चा आहे.

 

 

 

एकीकडे सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांकडून संभाजीनगरच्या जागेवर दावे प्रतिदावे केले जात असतानाच, याच संभाजीनगरात लोकसभा निवडणुकीत मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे.

 

 

छत्रपती संभाजीनगर जागा आपल्याला सुटावी म्हणून महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपकडून प्रयत्न केला जातोय. दुसरीकडे ही जागा आपल्याला मिळावी यासाठी महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसकडून प्रयत्न केले जातायत. त्यामुळे जागा कुणाला सुटते यावर अनेक गणित अवलंबून असतील

 

 

पाच मंत्री असलेला जिल्हा आपल्याच ताब्यात घेणं सत्ताधारी पक्षासाठी प्रतिष्ठेचा विषय असणार आहे. तर दुसरीकडे आपली ताकद दाखवण्यासाठी विरोधी पक्ष देखील तेवढ्यात जोमाने मैदानात असणार आहे.

 

 

त्यातल्या त्यात एमआयएमचे नेते इम्तियाज जलील देखील रिंगणात असतील. त्यामुळे संभाजीनगरमध्ये कोणाचा विजयाचा झेंडा फडकतो हे निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होईलच, मात्र त्यापूर्वी कोणत्या पक्षाला आणि त्यातल्या त्यात कोणत्या नेत्याला उमेदवारी मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *