गुप्तधनाचे आमिष दाखवत भोंदूबाबाने लावला लाखोंचा चुना
A fraudster duped millions of people by promising them secret money.

पैसाअडका, दागदागिना, संपत्ती हा हव्यास काही केल्या माणसाची पाठ सोडत नाही. मात्र हाच हव्यास आयुष्यात एकदातरी मोठी अद्दल घडवतो आणि हा धडा कधीच विसरता येणार नाही असा असतो.
सोलापुरात अशीच एक धक्कादायक घटना घडली असून, गुप्तधनाचा हंडा देतो सांगत एका भोंदूबाबानं अनेकांचीच फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा वार, मुंबईतील 7 कंपन्या अन् 8 भारतीयांवर बंदी
जमिनीतून गुप्तधनाचा हंडा काढून देतो असं सांगत भोंदू बाबानं 1 कोटी 87 लाखांची फसवणूक केल्याची खळबळजनक बाब समोर आली आहे. फसवणूक करणाऱ्या भोंदू बाबाला सोलापूर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केलं आहे.
मोहम्मद कादर शेख असं या फसवणूक करणाऱ्या भोंदू बाबाचं नाव असून, त्यानं सोलापुरात अनेकांची फसवणूक केल्याचं पोलीस तपासातून उघड झालं आहे.
मंत्री लोढा कुठे आहेत? यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते; मनसेचा हल्लाबोल
फसवणूक करणाऱ्या मोहम्मद कादर शेख याला कर्नाटकातील विजापूरमधून पोलिसांनी अटक केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे यांच्यासह पोलीस पथकानं ही कारवाई केली.
मोहम्मद कादर शेख याने सोलापुरातील गोविंद वंजारी यांना जमिनीतून गुप्तधन काढून देतो असं सांगत त्यांना आमिष दाखवलं आणि फसवणूक केली. ‘तुमच्या जमिनीत गुप्तधन लपवलं आहे, ते मी काढून देतो’
उद्धव ठाकरे म्हणाले , शेतकऱ्यांचा पॅकेज म्हणजे महायुती सरकारची ही सर्वात मोठी थाप
असं सांगत त्यांचा विश्वास जिंकला आणि कावेबाजपणानं त्यानं वंजारी यांच्याकडून मोठी रक्कमही घेतली. काही दिवस उलटल्यानंतर वंजारींना शेखवर संशय आला, त्यानं आपली फसवणूक केल्याची कुणकूण त्यांना लागली.
आपल्यासोबत घडलेल्या प्रकाराचं गांभीर्य ओळखून त्यांनी तकड पोलीस स्थानक कठलं. ज्यानंतर याबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर सोलापूर पोलीस दलाच्या गुन्हे शाखेने सापळा रचून भोंदू बाबाला त्याच्या राहत्या घरातून अटक केली.
अफगाणिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्याच्या पत्रकारपरिषदेत महिला पत्रकारांना नो एन्ट्री
या कारवाईमध्ये पोलीस पथकाला त्याच्या विजापुरातील आदिलशाहीनगरच्या घरातून जादूटोण्याचं साहित्यही सापडलं. दरम्यान शेख याला 13 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून, त्यानंतर त्याच्यावर पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.








