ऑनलाईन सर्व्हिसच्या नावाखाली बँक खात्यातून 4 लाख 65 हजार गायब
4 lakh 65 thousand disappeared from bank account under the name of online service

घरातील वॉशिंग मशिन दुरुस्तीसाठी गुगलवरुन सर्व्हिस सेंटरला कॉल केला, दरम्यान एपीके फाईल मोबाईलवर आली अन् दोन दिवसांनी एका व्यक्तीच्या मोबाईलमधून चक्क पावणे पाच लाख रुपये गायब झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
मोबाईल वापरत असताना ऑटो डाऊनलोड सेटिंग सुरू राहिल्याने हॅकरने मोबाईल हॅक करून जळगाव मधील रहिवासी निलेश सराफ यांच्या बँक खात्यातून तब्बल 4,65,000 लाखांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
मोबाईल कंपन्यांकडून 5G च्या नावाखाली ग्राहकांची लुट?
अलिकडच्या काळात मोबाईलवरुन ऑनलाईन ट्रान्झॅक्शन किंवा ऑनलाईन खरेदी, आर्थिक व्यवहार ही देखील आपली गरज बनली आहे. मात्र, मोबाईल बँकिंग वापरताना प्रत्येकाने काळजी घ्यायला हवी, हेच या घटनेतून दिसून येते.
मोबाईल वापरणे, त्यातही स्मार्टफोन वापरणे ही आता प्रत्येकाची जीवनावश्यक बाब बनली आहे. मात्र मोबाईल हाताळताना काळजी घेणे गरजेचे झाले आहे.
तुम्ही सकाळी वापरणारी कोलगेट खरी आहे काय? पाहा :VIDEO
मोबाईल सेटिंगमधील ऑटो डाऊनलोड सेटिंग सुरू राहिल्याचा फटका जळगावमधील निलेश सराफ यांना बसला असून, चोरट्यांनी त्यांचा मोबाईल हॅक करत तब्बल पावणे 5 लाखांची लूट केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
जळगाव शहरातील रहिवासी असलेल्या निलेश सराफ यांच्या घरातील कपडे धुण्याचे मशीन खराब झाल्याने त्यांनी कपडे धुण्याचे मशीन खरेदी केलेल्या कंपनीला मशीन दुरुस्तीसाठी कॉल केला होता.
या कॉल नंतर त्यांना ओटीपी मागण्यात आल्याचं सराफ यांनी म्हटलं. सराफ यांनी संबंधित कंपनीला ओटीपी दिल्यानंतर काही वेळातच त्यांच्या बँक खात्यातून तब्बल 4 लाख 65 हजार रुपये काढले गेल्याचे त्यांच्या लक्षात आले.
मुख्यमंत्री म्हणतात निवडणुकीत युती तर त्यांचे मंत्री म्हणतात युती नाही झाली तर पाडापाडी
निलेश सराफ यांच्या बँक खात्यातून पैसे काढले गेल्याचे लक्षात येताच त्यांनी तातडीनं सायबर पोलिसात जाऊन तक्रार दाखल केली आहे.
या तक्रारीच्या अनुषंगाने सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या घटनेचा शोध घेत आहेत, अशी माहिती पोलिस उपअधीक्षक नितीन गणपुरे यांनी दिली.
दरम्यान, सायबर क्राईमला मी याबाबत गुन्हा नोंदवला असून पोलीस तपास करत आहेत. मात्र, गुगलवरुन कुठल्याही सर्व्हीस सेंटरचे नंबर काढून तुम्ही कुणालाही ओटीपी देऊ नका, असे आवाहन निलेश सराफ यांनी केले आहे.









