बोगस मतदार;एकाच घरात 813 मतदारांची नोंद
Bogus voters; 813 voters registered in one house

महाराष्ट्रातील सर्वात मोठा मतदार यादी घोटाळा पुण्यात झाला आहे. एका घरावर 813 मतदारांची नोंद झाली आहे. जयंत पाटील यांनी पुणे कँन्टोनमेंट मतदारसंघात बोगस मतदार नोदींचा गंभीर आरोप केला.
मंगळवार पेठेतील बूथ क्रमांक 30 मध्ये घर क्रमांक 226 या एकाच पत्त्यावर तब्बल 813 बोगस मतदार नोंदले गेल्याचा आरोप जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला.
जगात थैमान घालणाऱ्या जीवघेण्या आजाराचा पहिला रुग्ण महाराष्ट्रात :आरोग्य यंत्रणेत खळबळ
याप्रकरणी झी २४ तासनं रिऍलिटी चेक केला. जयंत पाटील यांनी केलेल्या आरोपाची पडताळणी करण्यासाठी झी २४ तासनं थेट पत्ताच शोधून काढला.
यामध्ये घर क्रमांक 226 असा उल्लेख असला तरी प्रत्यक्षात ती 226 क्रमांकाची गल्ली निघाली. जयंत पाटील यांनी पुणे कँन्टोमेॆट मतदार संघातील मंगलवार पेठेतील बूथ क्रमांक 30 वर घर क्रमांक 226 या एकाच पत्त्यावर
तब्बल 813 बोगस मतदार नोंदले गेल्याचा गंभीर आरोप केला आहे. याच आरोपाची पडताळणी करण्यासाठी आम्ही थेट पत्ताच शोधून काढला असता ती 226 क्रमांकाची गल्ली निघाली.
धक्कादायक;IPS आत्महत्या प्रकरनाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्याचीच आत्महत्या
मतदार यादीतील या घोळाबाबत सत्ताधारी पक्षाचे माजी नगरसेवक लक्ष्मण आरडे आणि स्थानिक आंबेडकर वादी कार्यकर्ता संतोष भिमाले यांच्याशी जयंत पाटील यांनी आरोप केलेल्या बूथ क्रमाक 30 ची मतदार यादीच शोधून काढली
असता त्या मतदार यादीतीलबहुतेक मतदारांचा पत्ता हा मंगलवार पेठ, घर क्रमांक 226 असा आढळून आला प्रत्यक्षात ती गल्ली निघाली.
उद्यापासून वादळी पावसाचा इशारा ; हवामान विभागाची माहिती
निवडणूक आयोगासोबत झालेल्या बैठकीनंतर विरोधकांनी वाय बी चव्हाण सेंटर येथे पत्रकार परिषद घेतली यामध्ये जयंत पाटील यांनी बडनेरा विधानसभा मतदारसंघातील बूथ क्रमांक 211 मध्ये 450 मतदारांचा घर क्रमांक 0 असल्याचा उल्लेख केला आहे.
ऑनलाईन सर्व्हिसच्या नावाखाली बँक खात्यातून 4 लाख 65 हजार गायब
ठाकरेंचे कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख रोहिदास मुंडे यांनी हा आरोप केला. याबाबत त्यांनी संजय राऊतांची भेट घेतली. मतदार यादीतून ही दुबार नावे काढली नाहीत तर निवडणूक होऊ देणार नाही असा इशारा रोहिदास मुंडेंनी दिला.







