मुख्यमंत्री,केंद्रीयमंत्री येण्यापूर्वीच मंचावर साप; यंत्रणा अडचणीत

Snakes on stage even before the arrival of the Chief Minister and Union Minister; The system is in trouble

 

 

पुण्यातील सिम्बॉयसिस महाविद्यालयात केंद्रीय सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मंत्री एकाच मंचावरती येणार होते.

मतदार यादीतून चक्क 19 गावं गायब

मात्र तत्पूर्वी मंचासमोर साप आढळून आला, यामुळं यंत्रणा अडचणीत आल्याचं दिसून आलं. साप मंचाखाली गेला नंतर मंत्री महोदय मंचावर येण्यापूर्वी साप बाजूला करण्याचं आव्हान यंत्रणासमोर आलं. सिम्बॉयसिस महाविद्यालयात पदवी प्रदान सोहळ्याआधी ही घटना घडली आहे.

 

पुण्यामध्ये मुख्यमंत्री आणि संरक्षण मंत्र्यांच्या कार्यक्रमांच्या स्थळी साप आढळून आल्याने खळबळ उडाली. मुख्यमंत्री आणि संरक्षण मंत्री ज्या ठिकाणी बसणार होते त्या मंचाजवळच हा साप आढळून आला.

राज ठाकरे म्हणाले ‘मतदार यादी गोपनीय का?आयोग लपाछपी का करतंय ?

मुख्यमंत्र्यांचा ताफा त्याचवेळी घटनास्थळी दाखल झाला होता. त्यावेळी तो साप सर्व मान्यवर बसणार त्या स्टेजखाली जाऊन बसला.

 

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रकांत पाटील, माधुरीताई मिसाळ हे सगळे मान्यवर या मंचावरती आहेत.

जयंत पाटलांचा खळबळजनक आरोप,मतदारांची नावे ठेवण्यासाठी हिरवा पेन, नावं काढण्यासाठी लाल पेन

ते येण्यापूर्वीच सापाने मंचाच्या समोरच शिरगाव केल्याचे दिसून आला यंत्रणांकडून सर्व खबरदारी घेतली जात आहे. संरक्षणाच्या दृष्टिकोनातून पावले उचलली जात आहे सर्पमित्राला बोलावून सापाला पकडण्याचे प्रयत्न सुरू होते, या सापामुळे कोणालाही हानी पोहोचलेले नाही.

 

 

Related Articles