हिंगोली जिल्ह्यात शिंदे सेना स्वबळावर लढणार

Shinde Sena will fight on its own in Hingoli district

 

 

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शिवसेना हिंगोली जिल्ह्यात स्वबळावर लढवणार आहे. एकनाथ शिंदे यांनी सांगितला आहे की जिथे युती शक्य आहे तिथे युती करा,

 

अन्यथा स्वबळाची तयारी करा आणि त्यानुसार आम्ही कार्यकर्त्यांना सूचना दिल्या आहेत. अशी माहिती शिंदेंच्या शिवसेनेचे कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांनी दिली आहे.

भाविकांचा भीषण अपघात, 6 जणांचा जागीच मृत्यू, 10 जखमी

युती जर केली तर कार्यकर्त्यांवर अन्याय होत असतो. सर्व कार्यकर्त्यांना न्याय मिळावा यासाठी शिवसेना स्वबळावर निवडणुका लढणार आहे. असेही ते म्हणाले.

 

मैत्रीपूर्ण लढत देणार आहोत. त्यात राष्ट्रवादी शिवसेना आणि भाजप युतीने पक्षातील कार्यकर्त्यांना वाटतं की आम्हाला उमेदवारी मिळाव. परंतु ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे.

बोगस शिक्षक भरती; तीन शिक्षण अधिकारी निलंबित

कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडू नये, कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून त्यांना निवडून आणण्याचे काम सर्व नेत्यांनी करावं, असेही आमदार संतोष बांगर म्हणाले.

 

हिंगोली नगरपालिका पूर्वी भाजपकडे होती. आता या नगरपालिकेत शिवसेना स्वबळावर लढणार असून धनुष्यबाणाचा नगराध्यक्ष आणि नगरसेवक नगरपालिकेमध्ये असतील.

आरक्षण GR फसवा आक्रमक मराठा आंदोलकांकडून ; विखे पाटील यांना घेराव

हिंगोली कळमनुरी आणि वसमत या तीनही नगरपालिकेमध्ये हीच परिस्थिती असेल. ज्या ज्या ठिकाणी युती होत असेल तिथे युती करा, जिथे युती होत नसेल तिथे मैत्रीपूर्ण लढत द्या.

 

कुणावरही टीका करायची नाही. आपण आपलं काम दाखवायचं आणि पक्षाचं वर्चस्व दाखवून द्यायचं, असा निर्धार संतोष बांगर यांनी यावेळी केला आहे.

शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकत्र,चर्चांना उधाण ?

जळगावच्या पाचोरा, भडगाव मतदारसंघात महायुतीत मिठाचा खडा पडल्याचे बघायला मिळाले आहे. शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत स्वबळाचा नारा दिल्यानंतर,

 

भाजपनेही आता स्वबळाचा नारा दिला आहे. त्यामुळे पाचोरा, भडगाव मतदार संघातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता शिवसेना आणि भाजप स्वबळावर लढणार असल्याचे चित्र आहे.

मुख्यमंत्री सोडून संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा, उद्या नवे मंत्री शपथ घेणार

त्यापाठोपाठ आता हिंगोलीतही शिंदेच्या शिवसेनाच स्वबळावरचा नारा दिला असून याबाबत आमदार संतोष बांगर यांनी माहिती दिली आहे.

 

 

Related Articles