भाविकांचा भीषण अपघात, 6 जणांचा जागीच मृत्यू, 10 जखमी

Devotees meet with terrible accident, 6 people die on the spot, 10 injured

 

 

नंदूरबार जिल्ह्यातील चांदशैली घाटात शनिवारी एक भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी आहेत. यापैकी काही जणांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

सुधा मूर्ती यांना होतोय सामाजिक-आर्थिक सर्वेक्षणाचा त्रास

प्राथमिक माहितीनुसार, येथील चांदशैली घाटात पिकअप गाडी उलटून हा अपघात झाला. या गाडीतील लोक अस्तंबा यात्रेसाठी गेले होते.

 

ही यात्रा संपवून माघारी परतत असताना काळाने या भाविकांवर घाला घातला. चांदशैली घाटातून पिकअप गाडी जात असताना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि मोठा अपघात झाला.

 

प्राथमिक माहितीनुसार, आतापर्यंत या अपघातामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी झाले आहेत. यापैकी 10 जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे

शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकत्र,चर्चांना उधाण ?

. त्यामुळे दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढण्याची दाट शक्यता आहे. सध्या या सर्वांना तळोदा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले जात आहे.

 

या अपघातानंतर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्याकडून तातडीने बचावकार्य हाती घेण्यात आले. पोलिसांनी जखमींना पिकअप व्हॅनमधून बाहेर काढून उपचारासाठी रवाना केले.

आरक्षण GR फसवा आक्रमक मराठा आंदोलकांकडून ; विखे पाटील यांना घेराव

पिकअप व्हॅन घाटात असताना चालकाचे नियंत्रण सुटले आणि गाडी पलटी झाली. त्यामुळे वाहनाच्या मागच्या भागात बसलेले लोक खाली दबले गेले. अनेकांना जबर मार लागला.

 

त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. पोलीस बचाकार्यासाठी घटनास्थळी आले तेव्हा येथील दृश्य भयावह होते. अनेक लोक जखमी अवस्थेत रस्त्यावर पडून होते. यापैकी अनेकजण गंभीर जखमी दिसत होते. त्यामुळे या दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची दाट शक्यता आहे.

ओबीसी एल्गार मोर्चापूर्वीच नेत्यांमध्ये फूट

वाशिम: समृद्धी महामार्गावर इनोव्हा कारचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या भीषण अपघातात म्यानमारच्या दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

 

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर मुंबईवरून नागपूरकडे जाणाऱ्या वाशिमच्या मालेगाव ते जऊळका दरम्यान कॉरिडरवर क्रमांक 232 वर हा अपघात झाला आहे.

बोगस शिक्षक भरती; तीन शिक्षण अधिकारी निलंबित

इनोव्हा गाडीच्या वाहन चालकाला डुलकी लागल्यामुळे हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये 2 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

 

 

Related Articles