आत्महत्या करण्यापेक्षा एखाद्या आमदाराला कापून टाका;नेत्याचे खळबळजनक विधान

Cut off an MLA rather than commit suicide; Leader's sensational statement

 

 

बुलढाणा जिल्ह्यातील पातुर्डा गावात काल राज्यव्यापी शेतकरी हक्क परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. ज्यात प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू, महादेव जानकर आणि दीपक केदार यांच्या प्रमुख सहभागाने चर्चा झाली.

 

दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर आयोजित ही परिषद शेतकऱ्यांच्या दुःखाची आणि वेदनेची सभा ठरली. यावेळी बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांना उद्देशून खळबळजनक विधान केलंय. ज्याची राज्यभरात चर्चा होतेय. काय म्हणाले बच्चू कडू? सविस्तर जाणून घेऊ.

बिहार विधानसभा; महाआघाडीमध्ये गोंधळ होणार भाजपला होणार फायदा

शेतकऱ्यांना काहीच येत नसल्यासारखे वाटते, पण आत्महत्या करण्यापेक्षा एखाद्या आमदाराला कापून टाका, असे बच्चू कडू म्हणाले. तुम्ही विचारांची लढाई सोडून जाती-पातीच्या भांडणात अडकला आहात,

 

ज्यामुळे शेतकरी मागे पडला आहात. सोयाबीनसारख्या पिकांना कमी किमतीत विक्रीस भाग पाडले जात असताना शेतकऱ्यांनी बांगड्या भराव्यात, असे बच्चू कडू म्हणाले.

मोठ्या नेत्याचे वक्तव्य ,’राज्यात निवडणुका होतील की नाही याबाबत शंका’

मोर्चे, मेळावे आणि प्रचार सभांना गर्दी असते, पण शेतकरी परिषदांना कमी लोकप्रतिनिधित्व मिळते, अशी खंतही त्यांनी बोलून दाखवली.

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तलवारने सुरू केलेली लढाई लेखणीने संपवली, तर शरद जोशींनी अर्धा लाख पगाराची नोकरी सोडून शेतकऱ्यांसाठी झटले, असे सांगत त्यांनी शेतकऱ्यांच्या एकजुटीची आठवण करून दिली.

 

खळबळजनक घटना;धावत्या रेल्वेतून तिघांना फेकले
परिषदेत कडू यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. या सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांना भगवा, हिरवा, निळा रंगात विभागले आणि त्यामुळे शेतकरी विभागला गेला. शरद जोशी, बाबासाहेब आंबेडकर आणि स्वतः कडू यांना शेतकऱ्यांनीच पाडले,

 

कारण ते जातीच्या राजकारणात गुंतले नाहीत, असे कडू म्हणाले. लोकसभा निवडणुकीत कापूस किंवा सोयाबीनच्या भावाची मागणी केली नाही, फक्त जाती पाहिली गेली.

 

सर्व जाती एकाच मातीवर जगतात, शेतकरी प्रत्येक जातीत आढळतात, तरी सर्वाधिक कष्ट त्यांचे आणि लूट त्यांचीच होतेय. सरकार हे ‘डुक्करासारखे’ आहे – ते परवडत नाही, शहरातील आमदार परवडतात जे हप्ते वसूल करून मस्त असतात, असेही ते पुढे म्हणाले.

उमेदवारी न मिळाल्याने राजद नेते शर्ट फाडून रडू लागला ;पाहा ;VIDEO

तुमच्या बैलाला तरी लाथ मारता, पण आमदारांना नाही. शेतमालाला चांगला भाव मिळाला तर आम्ही लोकांना रोजगार देऊ शकतो. आरक्षणाने एखादा कुटुंब किंवा समाज सुखी होऊ शकतो,

 

पण योग्य भावाने संपूर्ण गाव आनंदी होईल, असे कडू म्हणाले. संभाजी महाराजांना औरंगजेबाने मारले नाही, तर सासऱ्यांनीच धोका दिला – असाच जाती-धर्माच्या विभागणीत शेतकरी एकत्र येत नाहीत,

दिवाळीवरचा मुस्लिम तरुणाचा हा हृदयस्पर्शी व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल

अन्यथा सरकार एका दिवशी सुधारेल. मोदी सरकारने अमेरिकेतून 100 लाख गाठी कापूस मागवला, पण मीडियात बातमी नाही, कारण मीडियाचे अर्धे मालक भाजपचे आहेत. मातीची किंमत वाढली नाही तर जग सुधरत नाही; गाव गरीब राहिले तरच शहर श्रीमंत होईल, असे त्यांनी सांगितले.

 

परिषदेच्या कडू यांनी 28 ऑक्टोबरला नागपूर मोर्च्याची घोषणा केली. पंजाबच्या शेतकऱ्यांनी 13 महिने काळे कायदे रद्द करायला लावले, तर आम्ही ‘बायकोची आठवण’ येऊन घरी परततो.

1 नोव्हेंबरला राज्यात विरोधकांचा निवडणूक आयोगावर विराट मोर्चा

शेतात जितकी मेहनत करता, तिच्या एका टक्क्याने आंदोलनात भाग घ्या, मग तुमचे हक्क मिळतील. जेव्हा सर्व रंगांचे झेंडे घेऊन शेतकरी लढतील, तेव्हाच सुखाचे दिवस येतील, असे आवाहन बच्चू कडू यांनी केले.

 

 

Related Articles