दुकानदार राहुल गांधींना म्हणाले ,लवकर लग्न करा, आम्ही वाट पाहतोय

Shopkeeper tells Rahul Gandhi, get married soon, we are waiting

 

 

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना त्यांच्या विवाहाबद्दल अनेकदा विचारले जाते. मागे एकदा तर त्यांची आई सोनिया गांधी यांनाही राहुल गांधी यांच्या लग्नाबद्दल विचारले होते.

 

तेव्हा सोनिया गांधी यांनी त्यांना तुम्हीच राहुलला मुलगी शोधा अशी विनवणी केली होती. आता चक्क दिल्लीतील एका मिठाईवाल्याने राहुल गांधी यांना दिवाळीच्या शुभेच्छा देताना त्यांच्या लग्नाचा विषय पुन्हा काढला आहे.

 

20, 21, 22 ते 25 ऑक्टोंबरला हवामान विभागाचा मोठा इशारा, प्रशासन अलर्ट मोडवर
जुनी दिल्लीतील एका प्रसिद्ध मिठाईच्या दुकानाच्या मालकाने काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना दिवाळीच्या निमित्ताने भेटताना लग्नाचा विषय काढला.

 

दुकानदार म्हणाला आमच्या कुटुंबाच्या अनेक पिढ्या राहुल यांच्या कुटुंबियांना मिठाईची सेवा देत आल्या आहेत. आता आम्ही त्यांच्या लग्नाची वाट पाहात आहोत.

 

आत्महत्या करण्यापेक्षा एखाद्या आमदाराला कापून टाका;नेत्याचे खळबळजनक विधान
जुनी दिल्लीतील घंटेवाला मिठाईच्या दुकानाचे मालक म्हणाले की राहुल गांधी यांनी लवकर लग्न करायला हवे.त्यांच्या या मागणीवर राहुल गांधी काही म्हणाले नाहीत केवल हसले !

 

राहुल गांधी दिवाळीच्या निमित्ताने घंटेवाला मिठाईच्या दुकानात आले होते. तेथे त्यांनी काही मिठाई तयार करण्यात हातभारही लावला. राहुल गांधी यांनी याचा एक व्हिडीओ सोमवारी त्यांच्या युट्युब चॅनलवर पोस्ट केला.

 

20, 21, 22 ते 25 ऑक्टोंबरला हवामान विभागाचा मोठा इशारा, प्रशासन अलर्ट मोडवर
या व्हिडीओत मिठाईच्या दुकानाचे मालकांना तुम्ही हे सांगताना ऐकू शकता, ‘ आम्ही तुमचे पणजोबा (जवाहरलाल नेहरू),आजी (इंदिरा गांधी),वडील (राजीव गांधी) आणि दिदी (प्रियंका गांधी) यांना मिठाईची सेवा दिली आहे.

 

आता केवळ एकाच गोष्टीची वाट पाहात आहोत. तुम्हाला विनंती आहे लवकर लग्न करा. तुमच्या लग्नाची वाट पहात आहोत. सर्वात आधी तुम्ही लग्न करा. त्याची मिठाई देखील आमच्याकडूनच घ्या. आम्ही त्याची वाट पाहात आहोत.

या देशातून 1891 भारतीय नागरिकांना बळजबरी बाहेर काढले

राहुल गांधी यांनी यावर कोणतेही उत्तर दिले नाही आणि केवळ हसले. लोकसभा विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांना हा व्हिडीओ पोस्ट करत म्हटले की, ‘जुन्या दिल्लीच्या प्रसिद्ध आणि

 

ऐतिहासिक घंटेवाला मिठाईच्या दुकानात इमरती आणि बेसनचे लाडू बनवण्यात हात आजमावला. शतकाहून जुन्या प्रतिष्ठीत दुकानाचा गोडवा आजही कायम आहे. खालीस, पारंपारिक आणि हृदयाला स्पर्श करणारी.’

संजय राऊत म्हणाले ‘ऐसा कोई सगा नही, जिसे भाजपने ठगा नही

त्यांचे म्हणणे आहे की दीपावलीचा असली गोडवा केवळ थाळीत नाही. तर नाती आणि समाजात देखील असतो. राहुल गांधी म्हणाले की तुम्ही सर्वांनी सांगा, तुम्ही दिवाळी कशी साजरी करत आहात आणि तिला कशाप्रकारे खास बनवत आहात ?’

 

Related Articles