लोकसभा निडणुकीत सुप्रिया सुळेंच्या विरोधात कोण तगडा उमेदवार ?

Who is a strong candidate against Supriya Sule in the Lok Sabha elections?

 

 

 

लोकसभा निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तशतशा मतदार संघातील संभाव्य उमदेरांमध्ये रस्सीखेच सुरु झालीय. पुण्यातील चार मतदार संघातही तशीच स्थिती निर्माण झाली आहे.

 

 

मागील दोन वर्षांत राज्यातील राजकारणाला मोठी कलाटणी मिळाली आहे. त्याचा परिणाम आगामी लोकसभा निवडणुकीवर होणार आहे.

 

 

पुणे, बारामती, मावळ आणि शिरुर मतदार संघात कोणत्या पक्षाकडून कुणाला उमेदवारी मिळणार? याची उत्सुकता लागली आहे.

 

 

उमेदवारी मिळवण्यासाठी चार मतदार संघात रस्सीखेच सुरु असल्याचे दिसतेय. उमेदवारांमध्ये रस्सीखेच सुरु झाल्यामुळे पक्षश्रेष्ठींची मात्र डोकेदुखी वाढली आहे. पाहूयात चारही मतदार संघातील सध्याची स्थिती काय आहे…

 

 

बारामती मतदार संघाकडे यंदा देशाचं लक्ष लागणार आहे. कारण, अजित पवार यांनी शरद पवारांपासून फारकत घेत वेगळी चूल मांडली आहे.

 

 

राष्ट्रवादी काँग्रेसकडून (शरद पवार गट) विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांना उमेदवारी देण्यात येणार, यात कोणतीही शंका नाही. पण अजित पवार यांनीही बारामतीमधून महायुतीचा उमेदवार निवडून येईल, असं भाष्य केले.

 

 

त्यामुळे येथे सुप्रिया सुळे यांच्या विरोधात कोणता उमेदवार रिंगणात उतरणार याकडे लक्ष लागलेय. भाजपने ही जागा अनेकदा लढवली आहे,

 

 

पण त्यांच्या पदरी नेहमी निराशाच पडली. पण त्यावेळी राष्ट्रवादी एकत्र होती, आता परिस्थिती बदलली आहे. शरद पवारांच्या विरोधात पुतण्याचे बंड केला.

 

 

त्यामुळे यंदा बारामती मतदार संघात काय होणार? याकडे राज्याचे लक्ष लागलेय. 2019 च्या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांनी भाजपच्या कांचन कुल यांचा दारुण पराभव केला होता.

 

 

पण यावेळची परिस्थिती वेगळी आहे. अजित पवार यांनी शरद पवार यांच्यापासून फारकात घेत, भाजपसोबत जवळीक साधली आहे. बारामती मतदार संघात महायुतीचा उमेदवार ठरवताना अजित पवार यांची भूमिका मोठी असणार आहे.

 

 

अमोल कोल्हे यांना पाडणार म्हणजे पाडणारच…. असं अजित पवार यांनी स्पष्ट शब्दात सांगितल्यानंतर शिरुर मतदार संघ चर्चेत आलाय. शरद पवार गटाकडून अमोल कोल्हे यांनाच पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

 

 

 

तर येथे शिवसेना शिंदे गट यांच्याकडून शिवाजीराव आढळराव हे इच्छूक आहेत. शिवसेनाकडून ते 2014 मध्ये याच मतदार संघाचे खासदार राहिलेत.

 

 

 

शिवसेनेत फूट पडल्यानंतर आढळराव यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. महाविकास आघाडीकडून येथे अमोल कोल्हे यांनाच उमेदवारी दिली जाते का? की शिवसेना (उद्धव ठाकरे गट) यांच्याकडून येथे एखादा उमेदवार देण्याची मागणी केली जाऊ शकते.

 

 

मावळ मतदार संघामध्येही मोठा घोळ आहे. 2019 च्या निवडणुकीत श्रीरंग बारणे यांनी अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांचा पराभव केला होता. श्रीरंग बारणे विद्यमान खासदार आहेत, ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आहेत.

 

 

महायुतीमध्ये ही जागा कुणाला मिळणार? एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला की अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला ही जागा मिळणार… याची उत्सुकता आहे. पार्थ पवार यांच्या पराभवाचा वचपा काढण्याचे मनसुबे अजित पवार यांच्या मनात असतील.

 

 

दुसरीकडे महाविकास आघाडीकडूनही या जागेसाठी शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यामध्ये चुरस आहे.

 

अजित पवार यांचे विश्वासू संजोग वाघेरे हे लवकरच उद्धव ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. लोकसभा उमेदावरी देऊ,

 

 

असे अश्वासन वाघोरे यांना उद्दव ठाकरेंनी दिल्याची चर्चा आहे. त्यामुळे हा मतदार संघ नेमका कुणाकडे जाणार… काँग्रेस की शिवसेना याचीही उत्सुकता लागली आहे.

 

 

 

पुणे लोकसभा मतदार संघ सध्या पोरकाय… सध्या पुणे लोकसभा मतदार संघात खासदारच नाही. 2019 मध्ये भाजपकडून निवडून आलेले गिरीश बापट यांचं अकाली निधन झालं. येथे पोटनिवडणूक झाली नाही.

 

 

त्यामुळे पुणे मतदार संघाला सध्या कोणताही खासदार नाही. पण आगामी लोकसभा निवडणुकीत या मतदार संघामध्येही चूरस पाहायला मिळेल. भाजपकडून इच्छूकांची रांगच लागली आहे.

 

 

सुनील देवधर, मुरलीधर मोहोळ, जगदीश मुळीक आणि गिरीश बापट यांची सून लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छूक आहेत. काँग्रेसकडून मोहन जोशी इच्छूक आहेत.

 

 

 

पुणे हा आधी काँग्रेसचा बालेकिल्ला होता, पण भाजपनं सध्या येथे वर्चस्व गाजवलेय. अनंत गाडगीळ, अभय छाजेड, गोपाळ तिवारी हे काँग्रेसकडून निवडणूक लढवण्यास इच्छूक आहेत.

 

 

महाविकास आघाडी आणि महायुतीशिवाय राज ठाकरेंचा मनसे, आप, वचिंत या पक्षातीलही काही उमेदवारांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी सुरु केली आहे. राज ठाकरे यांनी नुकताच पुणे दौरा केला, यामध्ये त्यांनी मतदार संघाचा आढावा घेतला.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *