हॉटेल ताजमध्ये मांडी घालून बसल्याने मोठा वाद ;पाहा VIDEO
Big controversy over sitting on lap in Taj Hotel; watch VIDEO

दिल्लीतील ताजमहाल हॉटेलमध्ये ‘युअरस्टोरी’च्या संस्थापक आणि सीईओ श्रद्धा शर्मा यांना मिळालेल्या अपमानास्पद वागणुकीमुळे नवा वाद निर्माण झाला आहे.
‘मी कोल्हापुरी चप्पल घालते त्या मी माझ्या कष्टाच्या पैशांनी घेतलेल्या आहेत आणि इथे आले आहे, पण इथं स्टाफने मला पाय खाली ठेवून बसा, असं सांगितलंय,’ असं म्हणत श्रद्धा शर्मा ) यांनी आपला संताप व्यक्त केला.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीची युती नाही ;फॉर्म्युला ठरला
श्रद्धा शर्मा हॉटेलमधील ‘हाऊस ऑफ मिंग’ या फाईन डायनिंग रेस्टॉरंटमध्ये गेल्या होत्या. कोल्हापुरी चप्पल आणि सलवार कमीज परिधान केलेल्या शर्मा या मांडी घालून बसल्या होत्या, ज्यावर हॉटेलच्या मॅनेजरने आक्षेप घेतला. ‘
हे एक फाईन डायनिंग रेस्टॉरंट आहे आणि येथे श्रीमंत लोक येतात, त्यामुळे तुम्ही व्यवस्थित बसावे,’ असे मॅनेजरने म्हटल्याचा आरोप शर्मा यांनी केला आहे. इतकेच नाही तर, त्यांना ‘क्लोज्ड शूज’ घालण्याचा सल्लाही देण्यात आला, ज्यामुळे हा वाद आणखीच चिघळला आहे.
दरम्यान, या बाबत स्वतः श्रद्धा शर्मा यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ शेयर करत घडलेल्या प्रकाराबद्दल माहिती दिली आहे. ‘एक सामान्य माणूस जो कठोर परिश्रम करतो,
आधार कार्ड अवैध ठरल्याने ५ लाख ७८ हजारहून अधिक विद्यार्थी शालाबाह्य
स्वतःचे पैसे कमवतो आणि आपल्या प्रतिष्ठेसह हॉटेलमध्ये येतो, त्याला या देशात अजूनही अपमान आणि अपमान सहन करावा लागतो,” असं श्रद्धा शर्मा तिच्या व्हिडिओमध्ये म्हणालीय. पुढे ती म्हणाली कि, “आणि माझी चूक काय आहे? मी फक्त नियमित पद्मासन शैलीत बसले म्हणून?”
शर्माने स्पष्ट केले की ती तिच्या बहिणीसोबत दिवाळीच्या जेवणासाठी बाहेर गेली होती. त्यावेळी हा प्रसंग घडला आहे. फाइन डायनिंगचा नेहमीच एक शांत नियम राहिला आहे, कसे कपडे घालावे, कसे वागावे आणि कसे बसावे. परंतु विविध क्षेत्रातील भारतीय लक्झरी रेस्टॉरंट्समध्ये प्रवेश करत असताना, या जुन्या नियमांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात. यावर सोशल मीडियावरूनही टीका केली जात आहे.
खळबळजनक मतचोरीचा आरोप केलेल्या ठिकाणी 80 रुपयात ऑपरेटरने मतदारांची नावे डिलीट केली
दरम्यान, श्रद्धा पुढे म्हणाली की, मला हे समजते की हे एक ‘चांगले रेस्टॉरंट आहे, अर्थातच, खूप श्रीमंत लोक इथे येतात आणि ते तुम्हाला एका विशिष्ट पद्धतीने बसून बंद शूज घालण्याची अपेक्षा ठेवतात’. “मात्र मला हे काळत नाही कि, मी कोल्हापुरी चप्पल घालते, जी मी माझ्या स्वतःच्या कष्टाच्या पैशाने विकत घेतली होती
आणि इथे सभ्य पोशाख घालून आली होती. पण ‘पाय खाली ठेवा’ असे सांगणे किंवा माझी बसण्याची पद्धत आक्षेपार्ह होती, हे सांगणं चुकीचे आहे. जर एखाद्याला समस्या असेल तर ते दर्शवते की आपण अजूनही श्रीमंती, संस्कृती आणि वर्गाच्या या विभागणीत अडकलो आहोत,
24 तासांत सोन्याचा भाव सहा हजारांनी कोसळला
का? मी कठोर परिश्रम करते, म्हणूनच मी येथे आहे. मी स्वतः या जेवणाचा खर्च करत आहे, मग काय अडचण आहे?” असं हि तिने विचारले आहे.
एक आम इंसान, जो मेहनत करके, अपना पैसा कमा कर, अपनी इज़्ज़त के साथ ताज होटल में आता है — उसे आज भी इस देश में ज़लील और अपमानित होना पड़ता है।
और मेरी गलती क्या है? सिर्फ़ ये कि मैं बैठ गई एक “regular padmasana style” में?
क्या ये मेरी गलती है कि ताज मुझे सिखा रहा है कि कैसे बैठना… pic.twitter.com/vKBYjg8ltb— Shradha Sharma (@SharmaShradha) October 21, 2025








