दारू पिऊन तरुणाने विमानात केला तमाशा,२०० जणांना फटका बसला
Drunk youth creates spectacle on plane, 200 people affected

लोकल ट्रेन किंवा बसमध्ये होणाऱ्या हाणामाऱ्या तुम्ही अनेकदा पाहिल्या असतील. पण हल्ली विमानातून प्रवास करणारे प्रवासी सुद्धा सर्रास हाणामारी करताना दिसतात.
ट्रम्प यांच्या निर्णयाने पुण्यात मोठा भूकंप येणार?
होय, विमान प्रवासी नेहमी सभ्य वर्तन करतात हा गोड गैरसमज दूर करणारा एक व्हिडिओ समोर आला आहे. एका प्रवाशाने चक्क दारू पिऊन विमानात धिंगाणा घातला आणि त्याचा फटका विमानातील इतर प्रवाशांना बसला.
त्याच्यामुळे विमानाने उशिरा उड्डाण घेतले. हा व्हिडिओ पाहून आता तुम्हीच सांगा अशा बेशिस्त प्रवाशांवर नेमकी कोणती कारवाई केली पाहिजे?
आधार कार्ड अवैध ठरल्याने ५ लाख ७८ हजारहून अधिक विद्यार्थी शालाबाह्य
घडलं असं की, बेंगळुरूहून दिल्लीला जाणारी फ्लाइट उड्डाण घेण्यास तयार होती. सर्व प्रवासी वेळेवर विमानात चढले होते, सीट बेल्ट लावून प्रवासासाठी तयार होते.
पण तेवढ्यात एक प्रवासी दारू पिऊन गोंधळ घालू लागला. क्रू मेंबर्सनी त्याला शांत बसवण्याचा प्रयत्न केला, पण तो काही ऐकायला तयार नव्हता. उलट, तो दारूच्या नशेत इतका बुडाला होता की गोंधळ घालण्याव्यतिरिक्त त्याला काहीच सुचत नव्हतं.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीची युती नाही ;फॉर्म्युला ठरला
दरम्यान, ही घटना विमानातील इतर प्रवाशांनी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केली आणि आता हा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत आहे.
विमानात सुरू असलेला हा तमाशा पाहून काही प्रवासी संतापले, तर काही प्रवासी देवाकडे प्रार्थना करत होते, “देवा, टेकऑफ तरी होऊ दे”
हा व्हिडिओ @karnatakaporf या X अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, तो आतापर्यंत ७ लाख ७४ हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. शिवाय अनेकांनी या व्हिडिओवर प्रतिक्रिया देत संताप व्यक्त केला आहे.
24 तासांत सोन्याचा भाव सहा हजारांनी कोसळला
काही नेटकऱ्यांच्या मते या व्यक्तीविरुद्ध कठोर कारवाई केली पाहिजे, तर काहीजण सिक्युरिटी गार्डवर टीका करत आहेत “मद्यधुंद अवस्थेत असलेल्या व्यक्तीला विमानात प्रवेशच कसा दिला?” असा सवाल ते करत आहेत.
या व्यक्तीमुळे विमानाच्या उड्डाणाला मोठा विलंब झाला आणि त्यामुळे इतर प्रवासीही प्रचंड नाराज झाले, कारण त्यांचा बहुमूल्य वेळ एका व्यक्तीच्या बेजबाबदार वर्तनामुळे वाया गेला.
हॉटेल ताजमध्ये मांडी घालून बसल्याने मोठा वाद ;पाहा VIDEO
असो, पण आता प्रश्न असा आहे. अशा बेशिस्त लोकांना आळा घालण्यासाठी विमान प्रशासनाने कोणती ठोस कारवाई करावी? तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया खाली नक्की सांगा.








