दोघा ठाकरेंच्या युतीचा शिंदेंना डबल फायदा
Shinde's alliance with the two Thackerays is a double benefit.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यासाठी सगळ्याच पक्षांनी कंबर कसली आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीला बंपर यश मिळाल्यानंतर तिन्ही पक्षांमध्ये जोरदार इनकमिंग झालं आहे.
त्यामुळे अनेक ठिकाणी महायुतीमधील तीन पक्षच एकमेकांच्या समोर उभे ठाकण्याची शक्यता आहे. ठाकरे बंधू एकत्र येत असल्यानं महायुतीला काही महापालिकांमध्ये जोरदार लढत द्यावी लागणार आहे. त्यामुळे महायुतीमधील मोठा भाऊ असलेल्या भाजपनं सावध पवित्रा घेतला आहे.
खळबळजनक मतचोरीचा आरोप केलेल्या ठिकाणी 80 रुपयात ऑपरेटरने मतदारांची नावे डिलीट केली
विधानसभा निवडणुकीत पानीपत झाल्यानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना युतीची गरज भासू लागली. ठाकरे ब्रँड वाचवण्यासाठी दोघांनी प्रयत्न सुरु केले आहेत.
गेल्या तीन महिन्यात त्यांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. ठाकरेंची युती झाल्यास त्याचा सर्वाधिक परिणाम मुंबईत दिसेल. मराठी मतं ठाकरेंच्या पाठीमागे उभी राहिल्यास भाजप, शिंदेसेनेसाठी आव्हान सोपं नसेल.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात तर शिवसेना उबाठा आणि मनसे यांचे एकत्र मोर्चे निघू लागले आहेत. दोन्ही पक्षांचे नेते, कार्यकर्ते युती झालीच असं मानून रस्त्यावर उतरले आहेत. त्यामुळे भाजपनं या दोन्ही ठिकाणी मवाळ भूमिका घेतली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीची युती नाही ;फॉर्म्युला ठरला
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या वर्षा निवासस्थानी दिवाळी निमित्त पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधला. त्यावेळी त्यांनी मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप १०० पेक्षा अधिक जागा जिंकेल,
असा विश्वास व्यक्त केला. भाजप केवळ संख्याबळाच्या जोरावर महापौर पदावर दावा करणार नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले. ‘जरी आमच्याकडे आकडे असतील,
आधार कार्ड अवैध ठरल्याने ५ लाख ७८ हजारहून अधिक विद्यार्थी शालाबाह्य
तरीही मी महापौर पदासाठी दावा करणार नाही. महापौर शिंदे यांच्या पक्षातूनही होऊ शकतो,’ असं फडणवीस यांनी म्हटलं. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा बालेकिल्ला असलेल्या मुंबईत भाजपनं दोन पावलं मागे घेतली आहेत.
शिंदेसेनेचे कमी नगरसेवक निवडून आले तरीही त्यांचा महापौर होऊ शकतो, असे स्पष्ट संकेत फडणवीस यांनी दिले आहेत. ठाकरेंच्या वाढत्या जवळिकीचा शिंदेंना फायदा होताना दिसत आहे.
मुंबईसह अन्य महापालिकेतील स्थितीवरही फडणवीस सविस्तर बोलले. ‘मुंबई महानगर प्रदेशातील (एमएमआर) ९ पैकी ४ महापालिकांमध्ये भाजप शिवसेनेसोबत युती करुन लढेल.
दारू पिऊन तरुणाने विमानात केला तमाशा,२०० जणांना फटका बसला
ठाण्यात युतीबद्दलचा निर्णय एकनाथ शिंदे घेतील. तर नवी मुंबईत काय करायचं ते गणेश नाईक बघतील,’ असं फडणवीस यांनी सांगितलं. शिंदे आणि त्यांच्या पक्षाचं ठाण्यातील मोठेपण फडणवीस यांनी मान्य केल्याची चर्चा आहे.
गेल्या महापालिका निवडणुकीत शिवसेना आणि भाजपनं ठाण्यात स्वबळ आजमावलं. त्या निवडणुकीत शिंदे यांनी सेनेचं नेतृत्व केलं. त्यांनी ६७ जागा निवडून आल्या. तर भाजपला केवळ २३ जागांवर समाधान मानावं लागलं.
ठाण्यात भाजपनं स्वतंत्र लढावं, असा नेते, आमदार, कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. मंत्री गणेश नाईक, आमदार संजय केळकर यासाठी सर्वाधिक आग्रही आहे. अब की बार ७० पार असा नारा देण्यात आलेला आहे.
बस चालकाने चक्क शिवीगाळ करत कानशिलात लगावली
पण ठाण्यातील महाविकास आघाडीची एकजूट, त्यांना मनसेची मिळत असलेली साथ पाहता भाजपनं सावध पवित्रा घेतला आहे. ठाण्याची सूत्रं शिंदे यांच्याकडे सोपवण्यात आलेली आहेत. ठाकरेंच्या एकीचा शिंदे यांना मुंबई, ठाण्यात फायदा होताना दिसत आहे.








