सोन्याच्या बाबतीत बाबा वेंगाची भविष्यवाणी धडकी भरवणारी

Baba Venga's prediction about gold is shocking

 

 

सणासुदीच्या काळात उच्चांकी झेप घेणाऱ्या सोन्या आणि चांदीच्या किमतीत गेल्या काही दिवसांत लक्षणीय घट झाली आहे. यामुळे ग्राहकांच्या चेहऱ्यावर आनंद खिळला असून

 

आता भविष्यात प्रति ग्रॅम किमती आणखी घसरतील अशी आशा निर्माण झाली आहे. दिवाळीनंतर भारतीय सराफा बाजारात सोन्याची किंमत थोडीशी घसरली असली तरी, एकूण किमती अजूनही आवाक्याबाहेर आहेत.

24 तासांत सोन्याचा भाव सहा हजारांनी कोसळला

2025 वर्षाचा शेवट दोन महिन्यांवर येऊन उभा असताना गुंतवणूकदार त्यांचे लक्ष 2026 कडे वळत आहेत – आणि एका जुन्या भाकितामुळे बाजारात पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

 

दरम्यान, बाबा वेंगाने 2026 मध्ये जागतिक स्तरावर मोठ्या उलथापालथीमुळे सोन्याच्या किमतीत मोठी वाढ होईल आणि बाजारातील मंदीमुळे सोन्याच्या किमतीत विक्रमी वाढतील असं भाकीत करून खरेदी करणाऱ्यांचे टेन्शन वाढले आहे.

दारू पिऊन तरुणाने विमानात केला तमाशा,२०० जणांना फटका बसला

बल्गेरियन रहस्यमयी बाबा वेंगाने 2026 मध्ये सोन्याच्या किमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे. वेंगा म्हणतात की जागतिक बाजारात अशांतता येऊ शकते, ज्यामुळे मंदी येण्याची शक्यता आहे.

 

असा परिस्थितीत, बाबा वेंगाची भविष्यवाणी खरी ठरली आणि जागतिक पातळीवर मोठे संकट आले तर सोन्याच्या किमती नवीन विक्रम गाठू शकतात.

दोघा ठाकरेंच्या युतीचा शिंदेंना डबल फायदा

त्याचवेळी, अशी परिस्थिती उद्भवल्यास सोन्याच्या किमतीत 25 ते 40 टक्के वाढ होण्याचा तज्ज्ञांचा विश्वास आहे. म्हणजे पुढील दिवाळीपर्यंत सोन्याच्या किमती 1,62,500 ते 1,82,000 दरम्यान उसळी घेऊ शकतील

 

आणि सोन्याचा एक नवीन विक्रम होण्याची शक्यता आहे. यंदा दिवाळीआधी सोन्याच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आणि प्रति 10 ग्रॅम 1,30,000 पर्यंत पोहोचली. मात्र, गेल्या काही दिवसांपासून या सोन्याचा भाव घसरणपंथीला आला आहे.

आधार कार्ड अवैध ठरल्याने ५ लाख ७८ हजारहून अधिक विद्यार्थी शालाबाह्य

जागतिक घडामोडी आणि आर्थिक अनिश्चिततेमुळे सोन्याच्या किमतीत सध्या वाढ झाल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे असून महागाई, व्यापारी तणाव आणि चलनातील चढ-उतार यांसारखे घटक गुंतवणूकदारांना सोन्यासारख्या सुरक्षित मालमत्तेकडे वळण्यास प्रवृत्त करत आहेत.

गोपीनाथ मुंडेंचा वारस कोण ? वाद पेटणार

याव्यतिरिक्त दरांबद्दलचे अनुमान, चलनातील अस्थिरता आणि मंदावलेली जागतिक वाढ यामुळे मौल्यवान धातूची मागणी वाढत आहे.

 

या घडामोडींमध्ये बाबा वेंगाची जुने भाकीत आणि जागतिक आर्थिक संकटाच्या इशाऱ्यांना सध्याच्या बाजारातील ट्रेंडशी जोडत आहेत.

 

 

Related Articles