246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतींच्या निवडणूक;2 डिसेंबरला मतदान 3 डिसेंबरला मतमोजणी

Elections to 246 Nagar Parishads and 42 Nagar Panchayats; Voting on December 2, counting on December 3

 

 

राज्य निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी राज्यातील 246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतींचा निवडणुकीचा कार्यक्रम सविस्तर जाहीर केला.

 

या सर्व नगर परिषदा आणि नगर पंचायतींसाठी येत्या 2 डिसेंबरला मतदान होईल. तर 3 डिसेंबरला मतमोजणी होईल. यावेळी निवडणूक आयुक्तांनी आणखी काही महत्त्वाची माहिती दिली.

नेत्याने सांगून टाकल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तारखा

या निवडणुकीत प्रत्येक उमेदवारासाठी जात वैधता प्रमाणपत्र बंधनकारक असेल, असं निवडणूक आयुक्त म्हणाले. जात वैधता प्रमाणपत्राशिवाय निवडणूक लढवली तर ६ महिन्यांच्या आत प्रमाणपत्र जमा करावं लागेल.

 

या कालावधीच्या आत प्रमाणपत्र नाही दिल्यास निवड रद्द केली जाईल, अशी स्पष्ट माहिती निवडणूक आययुक्तांनी दिली.

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन घटस्फोटाची चर्चा,जया बच्चन यांच्यासोबत नात्यावर बोलली ऐश्वर्या

या निवडणुकांमध्ये इलेक्ट्रॉनिक मशीन्सद्वारेच मतदान होणार असल्याची महत्त्वाची माहिती दिली. या निवडणुकीत VVPAT चा वापर केला जाणार नाही.

 

कारण या निवडणुकीत एका प्रभागात दोन उमेदवारांसाठी मतदान करायचं आहे. तशी यंत्रणा सध्या तरी उपलब्ध नसल्यामुळे VVPAT चा वापर निवडणुकीत केला जाणार नसल्यची माहिती आयुक्तांनी दिली.

मतदारांसाठी जे संकेतस्थळ दिलं आहे. त्यात सर्च फॅसिलिटी तिथे मतदारांना नाव आणि केंद्र शोधता येईल. मोबाईल अॅपद्वारे नाव आणि केंद्र शोधण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

सध्या जी मतचोरी सुरू आहे ती थांबवा ;शरद पवारांचा एल्गार

उमेदवाराविषयी माहितीही यात उपलब्ध असेल. मतदारनिहाय याद्या ७ नोव्हेंबरला प्रसिद्ध केल्या जातील, अशी महत्त्वाची माहिती निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली.

 

मतदान केंद्रामध्ये दुबार मतदार ओळखण्यासाठी विशेष स्टार व्यवस्था करण्यात आली आहे. मतदान केल्यास तितके स्टार दिसून येतील अधिक स्टार दिसल्यास त्यांना दुसऱ्या मतदान केंद्रावर मत देता येणार नाही, अशी देखील महत्त्वाची माहिती दिनेश वाघणारे यांनी दिली.

 

निवडणुकीचा कार्यक्रम ‘असा’ असेल
अर्ज दाखल करण्याची तारीख : 10 नोव्हेंबर 2025
अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख : 17 नोव्हेंबर 2025
अर्जांच्या छाननीची तारीख : 18 नोव्हेंबर 2025
अपील नसलेल्यांचा अर्ज मागे घेण्याची तारीख : 21 नोव्हेंबर 2025
अपील असेल्यांचा अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख : 25 नोव्हेंबर 2025
निवडणुकीचं चिन्ह आणि अंतिम उमेदरावांची यादी जाहीर करण्याची तारीख : 26 नोव्हेंबर 2025
मतदानाची तारीख : 2 डिसेंबर 2025
मतोमोजणीची तारीख : 3 डिसेंबर 2025

Related Articles