राज ठाकरें म्हणाले;’निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद बघून तळपायाची आग मस्तकात गेली’

Raj Thackeray said; 'Watching the Election Commission's press conference, the fire from the soles of my feet went to my head'

 

 

राज्य निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद पार पडली. या निवडणुकीत राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी राज्यातील 246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतींचील निवडणूक घोषित केली.

 

यावेळी पत्रकारांनी राज्य निवडणूक आयुक्तांना दुबार मतदार, मतदान याद्यांमधील घोळ याबाबत अनेक प्रश्न विचारले. त्यावर दिनेश वाघमारे यांनी उत्तर देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला.

दहावीत नापास पण MPSC मध्ये आला राज्यात अव्वल

पण महाराष्ट्रातील सर्वपक्षीय शिष्टमंडळाच्या प्रश्नांवर केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आपल्याला त्याबाबत कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही, असं उत्तर त्यांनी एका प्रश्नावर दिलं. राज ठाकरे यांनी आयुक्तांच्या पत्रकार परिषदेची एक क्लिप शेअर करत टीका केली आहे.

 

“आजच्या निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेची क्लिप मला कोणीतरी पाठवली. ती पाहून तळपायाची आग मस्तकात गेली! आणि आता १००% खात्री पटली की निवडणूक आयोग स्वायत्त आहे हे फक्त संविधानात आहे.

 

हे सत्ताधाऱ्यांच्या हातचं बाहुलं आहे. दुबार मतदार नोंदणीपासून, ते मतदार यादीतील अनेक घोळ या सगळ्यावर एकही प्रश्न विचारल्यावर जर निवडणूक आयोगाला एकही उत्तर देता येत नसेल

रेल्वेमध्ये तिकीटांच्या बुकींग नियमांत मोठा बदल

किंवा द्यायची इच्छा नसेल तर तुमचा उपयोग काय? जबाबदारी तर तुम्ही केंव्हाच झटकली आहेत, आत्ता उत्तरदायित्व पण नाकारणार, मग तुमच्या पदांच करायचं काय?”, असे सवाल राज ठाकरे यांनी केले आहेत.

 

“महाराष्ट्रातील जनतेने ही क्लिप जरूर पाहा. तुमच्या मतदानाचा ढळढळीत अपमानाचा उगम कुठून आहे हे तुम्हाला कळेल. बाकी या पत्रकार परिषदेत प्रश्न विचारून निवडणूक आयोगाची भंबेरी उडवणाऱ्या पत्रकारांचं मनापासून अभिनंदन”, असं राज ठाकरे म्हणाले आहेत.

 

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन घटस्फोटाची चर्चा,जया बच्चन यांच्यासोबत नात्यावर बोलली ऐश्वर्या

राज ठाकरेंनी शेअर केलेल्या व्हिडीओ पत्रकार मतदार याद्यांमधील घोळबाबत प्रश्न विचारताना दिसतोय. सुलभ शौचालयाच्या पत्त्यावर शेकडो मतदारांची नोंद झालीय.

 

त्यावर काय सांगाल? त्यावर “आम्ही केंद्रीय निवडणूकआयोगाकडून मतदार यादी घेतो”, असं उत्तर आयुक्तांनी दिलं. त्यावर पत्रकार मतदार याद्यांवर तुमचा वचक नाही का? असा प्रश्न विचारतो.

नेत्याने सांगून टाकल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तारखा

त्यावर “आम्ही फक्त ती यादी अॅडॉप्ट करतो”, असं उत्तर आयुक्तांनी दिलं. मग मतदारयाद्यांची शहानिशा कोण करतं? असा प्रश्न पत्रकाराने विचारला. त्यावर त्यांनी उत्तर दिलं.

 

“आम्ही शाहानिशा देखील करतो. दुबार मतदारअसतील तर बघतो. चुकीच्या प्रभागात गेलं का ते आम्ही बघतो. विधानसभेच्या यादी नाव आहे, पण यामध्ये नसेल तर ते आम्ही बघतो. काही चुका असतील तर ते आम्ही करतो”, असं आयुक्त म्हणाले.

 

ज्या ठिकाणी जागाच नाही तिथे मतदारांचा पत्ता नोंद आहे. त्याबाबत कुणाची तरी जबाबदारी असेल ना? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली.

246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतींच्या निवडणूक;2 डिसेंबरला मतदान 3 डिसेंबरला मतमोजणी

“प्रत्येक प्राधिकरणाची जबाबदारी निश्चित केलेली आहे. राज्य निवडणूक आयोगाचीजी जबाबदारी आहे ती राज्य निवडणूक आयोगाची आहे. भारत निवडणूक आयोगाचे जे अधिकार आहे ते भारत निवडणूक आयोगाचे आहेत”, असं उत्तर आयुक्तांनी दिलं.

 

 

Related Articles