17-परभणी लोकसभा मतदार संघ निवडणुकीसाठी 9 उमेदवारी अर्ज दाखल

17-9 nominations filed for Parbhani Lok Sabha constituency election

 

 

 

 

 

17-परभणी लोकसभा मतदार संघ निवडणुकीसाठी आज 03 उमेदवारांनी 09 नामनिर्देशन अर्ज दाखल केले. परभणी लोकसभा मतदार संघ निवडणुकीच्या नामनिर्देशन प्रक्रियेला गुरुवार, दि. 28 मार्च, 2024 पासून सुरुवात झाली आहे.

 

 

 

 

आज (दि.01) रोजी अपक्ष उमेदवार गोविंद रामराव देशमुख यांनी चार नामनिर्देशन अर्ज दाखल केले. तर दुसरा अर्ज राष्ट्रीय समाज पक्षाचे जानकर महादेव जगन्नाथ यांनी तीन नामनिर्देशन अर्ज दाखल केले.

 

 

 

तसेच अपक्ष उमेदवार आप्पासाहेब ओंकार कदम यांनी दोन नामनिर्देशन अर्ज दाखल केले असल्याची माहिती 17- परभणी लोकसभा मतदार संघाचे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी

 

 

 

 

तथा जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिली. यापूर्वी शनिवार (दि. 30) रोजी दोन अपक्ष उमेदवारांनी प्रत्येकी एक अर्ज दाखल केले आहेत.

 

 

 

 

 

तसेच आज 18 उमेदवारांना 30 नामनिर्देशन अर्जांचे वितरण करण्यात आले आहे. आतापर्यंत एकूण 61 इच्छुक उमेदवारांना 87 नामनिर्देशन पत्रांचे वितरण करण्यात आले आहे.

 

 

यावेळी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रघुनाथ गावडे, अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी दत्तु शेवाळे

 

 

 

 

यांच्यासह नामनिर्देशन पत्र दाखल करुन घेण्याच्या प्रकियेसाठी नियुक्त अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. उमेदवारांना गुरुवार, दि. 4 एप्रिलपर्यंत कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी 11 ते 3 यावेळेत

 

 

 

आपले नामनिर्देशन पत्र सादर करता येणार आहे. शुक्रवार, दि. 5 एप्रिल रोजी नामनिर्देशन पत्रांची छाननी करण्यात येणार असून, सोमवार, दि. 8 एप्रिल, 2024 पर्यंत उमेदवारांना आपले अर्ज मागे घेता येणार आहे.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *