अमेरिकेत विमानाचा भीषण अपघात ; उड्डाण घेताच कोसळले पाहा .. VIDEO
Terrible plane accident in America; See how it crashed right after taking off.. VIDEO

अमेरिकेत एक भीषण दुर्घटना घडली आहे. केंटकी येथील लुइसविले येथे एक मालवाहू विमान कोसळले आहे. विमान कोसळल्यानंतर भीषण आग लागली आहे. या घटनेचा भयावह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
जोपर्यंत कर्जमाफी नाही, तोपर्यंत सरकारला मत देणार नाही असे बोर्ड लावा;उद्धव ठाकरे
या अपघातात चार जणांचा मृत्यू आणि ११ गंभीर जखमी झाले आहेत. मंगळवारी ( दि. ०४ नोव्हेंबर) ही दुर्घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, UPS या कुरिअर कंपनीचे मोठे मालवाहू विमान होते, जे उड्डाण घेताच कोसळले. फेडरल एव्हिएशन अथॉरिटी ने सांगितले की, UPS फ्लाइट २९७६ ने अली आंतरराष्ट्रीय विमानतळानवरुन हवाईच्या डॅनियल इनौये आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे उड्डाण घेतले होते.
महाराष्ट्रावर पुन्हा मोठं संकट,10 जिल्ह्यांना हाय अलर्ट
यावेळी सायंकाळी ५ च्या सुमारास (स्थानिक वेळेनुसार) विमान लुइसव्हिले विमानतळाच्या दक्षिण भागात कोसळले आणि भीषण आग लागली. आगीमुळे अवकाशत दाट धूर आणि मोठ्या आगीच्या झळा दिसल्या.
स्थानिक पोलिस आणि अग्निशमन दलाल घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सध्या आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आग प्रचंड असून विमानचा मलबा परिसरात पसरला आहे.
मतदार यादीत फोटो आल्यानंतर काय म्हणाली ब्राझीलची मॉडेल लारिसा ?
चार मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तसेच ११ जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.
सध्या या अपघाताचे कारण अस्पष्ट आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार विमानात असलेल्या लिथियम बॅटऱ्यांमुळे आग लागली असल्याचे सांगितले जात आहे.
पार्थ पवारांच्या जमीन घोटाळ्याने महाराष्ट्रात खळबळ
यापूर्वी देखील २०१० मध्ये UPS फ्लाइ ६ चा दुबईजवळ लिथियम बॅटरीला आग लागल्याने असाच एक भीषण अपघात घडला होता.
सध्या सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये आग आणि मलब्यांचे भयंकर दृश्य दिसत आहे. स्थानिक पोलिसांनी विमानातळाच्या आठ किलोमीटर परिसरातील नागरिकांना बाहेर पडण्यास सांगितले आहे. तसेच विमानतळही बंद करण्यात आले आहे.
पुढील 3 दिवस महाराष्ट्रावर मोठे संकट येणार
FAA आणि नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्ड या अपघाताची चौकशी करत आहे. UPS कंपनीने ने पुढील तापासाची माहिती मिळाल्यानंतर अधिकृत केली जाईल असे म्हटले आहे. तसेच या घटनेवर दु:ख व्यक्त केले आहे.
NEW: Large explosions after UPS Flight 2976 crashes near Louisville International Airport in Kentucky pic.twitter.com/qQ2bSug3tz
— BNO News (@BNONews) November 4, 2025









