Video Viral लष्करी हेलिकॉप्टरचे दोन तुकडे झाले अन्… ; भयानक घटना

Video Viral: Military helicopter breaks into two pieces and…; Horrific incident

 

 

रशियात एक मोठा अपघात घडला आहे. रशियन लष्कराचे Ka-226 हेलिकॉप्टरचा अपघात झाला असून यामध्ये किमान पाच जणांचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले जात आहे.

 

या भयावह घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे. व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, हेलिकॉप्टरचे चॉपर तुटून विमानाचे दोन तुकडे झाले आहे. रशियाच्या दागेस्तान येथील समुद्रकिनारी ही दुर्घटना घडली आहे.

 

अमेरिकेच्या कंपन्यांमुळे भारतावर मोठं संकट
मिळालेल्या माहितीनुसार, ७ नोव्हेंबर रोजी ही घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. हेलिकॉप्टर समुद्रकिनाऱ्यावर उतरण्याचा प्रयत्न करत होते.

 

यावेळी हेलिकॉप्टरची शेपटी (मागची बाजू) एका खडकाला धडली. यामुळे मागचा रोटर तुटला, तसेच टॉपरही काही तुटले. यामुळे हेलिकॉरप्टटरचा तोल गेला.

 

यानंतर पायलटने हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत उशिर झाला होता. हेलिकॉप्टर एका घरावर कोसळले. यानंतर मोठा स्फोट झाला

राहुल गांधींना कार्यक्रमाला पोहचले उशीरा; सर्व कार्यकर्त्यांसमोरच मिळाली शिक्षा

आणि हेलिकॉप्टरसह घरालाही आग लागली. व्हिडिओ दिसत आहे की, हेलिकॉप्टर घरावर कोसळताच स्फोट झाला आणि आगच्या ज्वाला भडकू लागल्या.

 

सांगितले जात आहे की, या हेलिकॉप्टरमध्ये युरोपियन युनियनचे किझल्यार इलेक्ट्रोमेकॅनिकल प्लांटचे कर्मचारी होते. यामध्ये चार अधिकाऱ्यांच्या मृत्यूची पुष्टी झाली आहे.

अमेरिकेच्या कंपन्यांमुळे भारतावर मोठं संकट

तसेच फ्लाइट मेकॅनिकचाही मृत्यू झाला असल्याचे सांगितले जात आहे. तर दोन जण गंभीर जखमी झाले असल्याचे म्हटले जात आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहचून आग आटोक्यात आणली आहे. तसेच मृतदेहही बाहेर काढण्यात आले आहेत.

 

हा अपघात तांत्रिक बिघाडामुळे झाला असल्याचे सांगितले जात आहे, परंतु हेलिकॉप्टरमध्ये कोणत्याही प्रकारचा बिघाड समोर आलेला नाही. सध्या या घटनेची चौकशी सुरु करण्यात आली आहे. रशियाच्या विमान वाहतूक एजन्सीने या अपघाताला आपत्ती घोषित केले आहे.

अब्दुल सत्तार यांनी दिल्या आमदार निधीतून स्वत:च्याच शिक्षण संस्थेला 32 लाखांच्या रुग्णवाहिका

सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांचा थरकाप उडाला आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

 

 

 

 

Related Articles