5 विमानतळं बॉम्बने उडवणार, धमकीने खळबळ
5 airports to be bombed, threat creates excitement

दिल्ली येथील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटानंतर सुरक्षा यंत्रणांचा तपास सुरू असतानाच, दिल्ली विमानतळावर बॉम्बची धमकी मिळाल्याने काही काळ खळबळ उडाली.
राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी संपली;कोर्टात काय घडले ?
दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल ३ वर दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास बॉम्बची धमकी आल्याची नोंद करण्यात आली. धमकी मिळताच तात्काळ सुरक्षा तपासणी सुरू करण्यात आली. तपासणीनंतर, अग्निशमन विभागाने ही धमकी खोटी असल्याची पुष्टी केली.
अमेरिकेच्या कंपन्यांमुळे भारतावर मोठं संकट
तसेच दिल्ली पोलिसांच्या माहितीनुसार, इंडिगो एअरलाईनच्या तक्रार पोर्टलवर हा धमकीचा ईमेल आला होता. या ईमेलमध्ये केवळ दिल्लीच नव्हे,
तर चेन्नई आणि गोवा येथील विमानतळांनाही लक्ष्य करण्याचा उल्लेख होता. खबरदारी म्हणून, उल्लेख केलेल्या सर्व ठिकाणी कसून तपासणी करण्यात आली.
हवामान विभागाचा 7, 8, 9 आणि 10 नोव्हेंबरला अलर्ट, मोठा इशारा,
लाल किल्ल्याजवळील स्फोट आणि विमानतळाला मिळालेली धमकी या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या असून, पुढील तपास सुरू आहे.
देशातील 5 विमानतळे बाँम्बने उडवून देणार असल्याची धमकी मिळाली आहे. इंडिगो एअरलाइन्सला आज दुपारी 3.30 वाजता देशातील 5 आंतरराष्ट्रीय विमानतळांना बॉम्बने उडवण्याची धमकी देण्याबाबत मेल मिळाला आहे.
या ईमेलमध्ये दिल्ली, मुंबई, चेन्नई, त्रिवेंद्रम आणि हैदराबाद या पाच विमानतळांना बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे.








