डिसेंबरपासून नवा कायदा लागू;१६ वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया वापरावर बंदी

New law comes into effect from December; Children under 16 banned from using social media

 

 

अलीकडच्या काळात जगात मुले लहान वयातच इंटरनेटचा वापर करु लागली आहेत. युनायटेड नेशन्सच्या आकडेवारीनुसार, जगातील प्रत्येक अर्ध्या सेकंदाला एक मूल ऑनलाइन जगात प्रवेश करत आहे.

अमेरिकेच्या कंपन्यांमुळे भारतावर मोठं संकट

पण या ऑनलाइन क्रांतीने अनेक गंभीर आव्हानेही उभी राहिली आहे. मुलांच्या आरोग्यावर आणि विकासावर याचा परिणाम होत आहे. याच पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियात एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

 

आता 16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियाच्या वापरावर बंदी असणार आहे. यासाठी एक नवे विधेयक मंजूर करण्यात आले आहे.

राहुल गांधींना कार्यक्रमाला पोहचले उशीरा; सर्व कार्यकर्त्यांसमोरच मिळाली शिक्षा

सिनेटच्या मंजुरीनंतर या विधेयकाचे कायद्यात रुपांतर करण्यात आले असून डिसेंबर २०२५ पासून हा कायदा लागी होणार आहे. हे जगात प्रथमच घडत आहे

 

जेव्हा 16 वर्षांखालील मुले फेसबुक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट आणि टिकटोक सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करू शकणार नाहीत.

 

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी म्हटले आहे की, देशातील मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी आणि विकासाचे रक्षण करण्यासाठी हा निर्णय आवश्यत आहे. यामुळे आता ऑस्ट्रेलियात २०२५ नंतर १६ वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स वापरता येणार आहे.

 

राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी संपली;कोर्टात काय घडले ?
ऑस्ट्रेलियाच्या नव्या कायद्यानुसार, 16 वर्षाखालील मुलांना Facebook, Instagram, Snapchat आणि TikTok यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करण्यास मनाई आहे.

 

यानुसार, पालकांची संमती किंवा आधीपासून अस्तित्वात असलेल्या सोशल मीडिया खात्यांसाठी देखील कोणतीही सूट दिली जाणार नाही. तसेच मुलांना यापासून दूर ठेवण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मलाच व्यवस्था करावी लागणार आहे.

5 विमानतळं बॉम्बने उडवणार, धमकीने खळबळ

या नव्या कायद्यानुसार, कायदा लागू झाल्यानंतर सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सला ही बंदी कशी लागू ठेवायाची यासाठी एक वर्ष देण्यात येणार आहे. जर हे कार्य पूर्ण झाले नाही

 

तर प्लॅटफॉर्म्सला मोठा दंड भरावा लागेल. एकूण 32.5 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 270 कोटींचा दंड सर्व प्लॅटफॉर्म्सला द्यावा लागेल.

 

ऑस्ट्रेलिया सरकारेन म्हटले आहे जगभरात करण्यात आलेल्या अभ्यासातून आढळले आहे की, किशोरवयीन मुलांमध्ये सोशल मीडियाचे व्यसन वाढले आहे. मुलांचा स्क्रीन टाईम वाढत असून त्यांच्या झोपेवर याचा परिणाम होत आहे.

उपमुख्यमंत्री शिंदें अण्णा हजारेंना का भेटले ?‘हे’ कारण आले समोर

तसेच त्यांच्या मानसिक आरोग्यावरही गंभीर परिणाम दिसून आले आहे. यामुळे हे सर्व समस्या दूर करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. १० डिसेंबर २०२५ पासून हा कायदा लागू होणार आहे.

 

 

Related Articles