अजितदादांनी उपुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत होते ,मोठ्या नेत्याचा दावा

Ajit was preparing to resign from the post of Deputy Chief Minister, claims a senior leader

 

 

भाजपकडून पार्थ पवारचा बचाव केला जात आहे, असा आरोप शिवसेना उबाठा पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी गुरुवारी केला.

 

वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीत अजित पवार यांनी राजीनामा देण्याची भूमिका घेतली होती. मी राजीनामा देऊन सरकारला बाहेरून पाठिंबा देतो, असे ते मुख्यमंत्र्यांना म्हणाले होते, असा दावाही त्यांनी केला.

5 विमानतळं बॉम्बने उडवणार, धमकीने खळबळ

अंबादास दानवे यांनीही या प्रकरणात प्रसारमाध्यमांशी बोलताना गंभीर आरोप केले. कोणीतरी सांगितल्याशिवाय एका तहसीलदाराची एवढी हिंमतच होऊ शकत नाही.

 

त्यामुळे तहसीलदाराचा बळी देऊन पार्थ पवार आणि इतर मोठ्या अधिकाऱ्यांना वाचवणे चुकीचे आहे. पार्थ पवारवर गुन्हा दाखल झालाच पाहिजे. त्यादिवशी वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकांमध्ये मला मिळालेला माहितीनुसार,

उपमुख्यमंत्री शिंदें अण्णा हजारेंना का भेटले ?‘हे’ कारण आले समोर

अजित पवारांनी रागाने सरकारमधून बाहेर पडून बाहेरून पाठिंबा देतो, अशी भूमिका घेतली. मी दाव्याने हे बोलतोय. खरेखोटे बाहेर येईलच, असेही दानवे म्हणाले.

भाजपनेच अडचणीत आणायचे आणि त्यांनीच बाहेर काढायचे असे काम यात झाले आहे. कंपनीचा संचालक असतानाही पार्थ पवारावर गुन्हा दाखल का होत नाही? मुद्रांक शुल्क चुकवले जाते म्हणून कारवाई होते.

डिसेंबरपासून नवा कायदा लागू;१६ वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया वापरावर बंदी

व्यवहारच झाला नाही तर मुद्रांक शुल्क का भरायचे, असेही सांगितले जाते. मात्र, जोपर्यंत मुद्रांक शुल्क भरले जात नाही, तोपर्यंत व्यवहार रद्द होत नाही हा नियम आहे, असे दानवे म्हणाले.

 

पार्थ पवार लहान बाळ नसून लोकसभेची निवडणूक लढलेला उमेदवार आहे. त्यामुळे भारताचा एक नागरिक म्हणून आणि गुन्हेगार म्हणून त्याला वागणूक दिली पाहिजे, अशी मागणीही दानवे यांनी केली.

राजकारणात खळबळ;अजित पवारांच्या पक्षाचेच मंत्री म्हणाले ,अजित पवारांना राजीनामा द्यावा लागेल

भाजपनेच अडचणीत आणायचे आणि त्यांनीच बाहेर काढायचे असे काम यात झाले आहे. कंपनीचा संचालक असतानाही पार्थ पवारावर गुन्हा दाखल का होत नाही?असे अंबादास दानवे म्हणाले

 

Related Articles