बिहारमध्ये अजित पवारांचे 13 उमेदवारामध्ये सर्वात जास्त मते घेणारा उमेदवार 370 मतावर
Ajit Pawar's candidate who got the most votes among 13 candidates in Bihar is 370 votes.

बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होत असून यामध्ये भाजप आणि संयुक्त जनता दलाला प्रचंड यश मिळाले आहे. आज (14 नोव्हेंबर 2025) सकाळी आठ वाजता आधी पोस्टल आणि
नंतर ईव्हीएम यंत्रातील मतांच्या मोजणीला सुरुवात झाली. बिहारमधील या चुरशीच्या लढाईत एकीकडे भाजपने घवघवीत यश मिळवल्याचं दिसत आहे, तर दुसरीकडे अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दणका बसला आहे.
पार्थ पवार जमीन घोटाळा,राहुल गांधी म्हणाले मतचोरी करुन बनलेल्या सरकारची जमीन चोरी, मोदीजी तुमचं शांत
बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएचा दणदणीत विजय होत असल्याचे चित्र आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला (एनसीपी – अजित पवार गट) मात्र मोठा धक्का बसला आहे.
बिहारमध्ये स्वबळावर लढलेल्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांना जनतेने पूर्णपणे नाकारले असून, एकाही जागेवर आघाडी मिळवता आलेली नाही. पक्षाने उतरवलेल्या 15 उमेदवारांपैकी 13 जणांच्या मतांची संख्या इतकी कमी आहे की, त्यांचे डिपॉझिट (अनामत रक्कम) जप्त होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पार्थ पवारांच्या जमीन घोटाळ्याने महाराष्ट्रात खळबळ
बिहारमध्ये एनडीएने (भाजप + जेडीयू + इतर) 200 पेक्षा जास्त जागांवर विजय मिळवताना दिसत आहेत. या निवडणूकीत महागठबंधनला अवघ्या 48-50 जागांवर समाधान मानावे लागत असल्याचे चित्र आहे.
भाजप बिहारमध्ये सीएम नितीशकुमारांचे शिंदे करण्याच्या तयारीत ?
या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी बिहारमध्ये स्वतंत्रपणे उमेदवार उतरवून राष्ट्रीय पक्षाचा दर्जा परत मिळवण्याची रणनीती आखली होती, पण ती पूर्णपणे फसली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे भाग होण्यापूर्वी शरद पवारांच्या नेतृत्वाखाली अनेक राज्यांमध्ये राष्ट्रवादीची ताकद होती.
अजित पवारांच्या उमेदवरांच्या मतांची यादी एकदा पहा
नौटन- जय प्रकाश (43 मतं)
पिंप्रा -अमित कुमार कुशवाह (370 मतं)
मनिहारी – सैफ अली खान (196)
पारसा – बिपीन सिंह (144)
सोनेपूर – धर्मवीर कुमार (25)
महुआ – अखिलेश कुमार ठाकूर (149)
राघोपूर- अनिल सिंह (147)
बाखरी – विकास कुमार (127)
अमरपूर – अनिल कुमार सिंह (52)
पाटना साहिब – आदिल आफताब खान (192)
मोहानिया – मुन्ना कुमार (80)
सासाराम – आशुतोष सिंह (21)
दिनारा – मनोज कुमार सिंह (53)
अजित दादांच्या नेतृत्त्वाखालील पक्षाच्या अनेक उमेदवारांना 500 मतांचा टप्पाही ओलांडता आलेला नाही. निवडणूक नियमांनुसार,
VIDEO;न्यू यॉर्कच्या महापौरपदी ममदानी यांचा विजय ;विजयी भाषणात ‘धूम मचाले’चा जलवा
मतदारसंघातील एकूण वैध मतांच्या 1/6 भाग इतकी मतं न मिळाल्यास डिपॉझिट जप्त होते. अजित पवारांच्या स्वतंत्रपणे रिंगणात उतरवलेल्या बहुतांश उमेदवाराची हिच परिस्थीती आहे.








