राहुल गांधींचे निवडणूक आयोगाला आव्हान;बिहारमधील मतचोरीचे दोन आठवड्यांत पुरावे देणार
Rahul Gandhi challenges Election Commission; Will provide evidence of vote rigging in Bihar within two weeks

बिहार विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर काँग्रेसने थेट मतचोरीचा आरोप करत निवडणूक आयोगावर निशाणा साधला आहे.
पक्षाकडून निवडणुकीतील हेराफेरीचे पुरावे गोळा केले जात असून ते दोन आठवड्यांत देशासमोर सादर केले जातील,असे खुले आव्हान काँग्रेसचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांनी दिले आहे.
अब्दुल सत्तार यांनी दिल्या आमदार निधीतून स्वत:च्याच शिक्षण संस्थेला 32 लाखांच्या रुग्णवाहिका
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत या संदर्भातील महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. बैठकीला लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, के.सी. वेणुगोपाल,
कोषाध्यक्ष अजय माकन आणि राष्ट्रीय प्रवक्ते पवन खेरा उपस्थित होते. बिहारमधील पराभवाची कारणे, मतमोजणीतील अनियमितता आणि भविष्यातील रणनीतीवर सविस्तर चर्चा झाली.
अजित पवार जमीन व्यवहार प्रकरणी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
वेणुगोपाल आणि अजय माकन यांनी बिहार निवडणूक निकालांबाबत निवडणूक आयोगावर गंभीर प्रश्न उपस्थित करत सांगितले की, मतमोजणीच्या अनेक टप्प्यांवर मोठ्या प्रमाणात हेराफेरी झाल्याचे पक्षाला वाटते.
बिहार निवडणुकीत मतचोरी झाल्यामुळेच पक्षाचा पराभव झाला. काँग्रेस आता संपूर्ण मतदानाच्या आकडेवारीचा तपशीलवार आणि सखोल आढावा घेणार असून,
अजित पवार जमीन व्यवहार प्रकरणी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
अहवाल तयार झाल्यानंतर निवडणुकीतील कथित मतचोरीची माहिती देशासमोर मांडली जाईल. एसआयआर आणि मतचोरीच्या मुद्द्यावर काँग्रेस रस्त्यांपासून संसदेपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार असल्याचेही बैठकीत निश्चित करण्यात आल्याचेही के.सी. वेणुगोपाल यांनी स्पष्ट केले.
६ जागांवर विजय
काँग्रेसने बिहारमध्ये ६१ जागांवर उमेदवार उभे कैले होते, परंतु त्याना फक्त सहा जागांवर विजय मिळाला, पक्षाच्या मतांचा वाटा ८.७१% पर्यंत घसरला, जो २०२० मध्ये ७० जागा लढवताना ९.६% होता.
‘व्हीव्हीपॅट नाही तर मतपत्रिकेवर मतदान घ्या ,मागणीची कोर्टाकडून गंभीर दखल
सुरेंद्र प्रसाद (वाल्मिकी नगर), अभिषेक रंजन (चनपटिया), मनोज विस्वास (फोर्ब्सगंज), अबिदुर रहमान (अररिया), मोहम्मद कमरूल होडा (किशनगंज) आणि मनोहर प्रसाद सिंग (मनिहारी) है सहा उमेदवार विजयी झाले.
सूत्रांनुसार, राहुल गांधी यांनी काँग्रेस पक्षातील गटबाजी आणि बुथ व्यवस्थापनातील त्रुटींबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. पैशाच्या बदल्यात तिकीट वाटपाच्या आरोपांची गंभीरता तपासण्यास सांगितले.
राहुल यांनी त्यांच्या सल्लागार गटाने संपूर्ण निवडणुकीत अंधारात ठेवले, याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली. उमेदवार निवडण्यासाठी विश्वासू नेत्यांची समिती स्थापन करूनही योग्य उमेदवार का निवडले गेले नाहीत ?
तिकीट विक्रीचे आरोप का केले जात आहेत? असे सवाल उपस्थित करत सत्य समोर आणले पाहिजे. या प्रकरणात जो कोणी दोषी आढळेल त्याला सोडले जाणार नाही.
राजकारणात खळबळ;अजित पवारांच्या पक्षाचेच मंत्री म्हणाले ,अजित पवारांना राजीनामा द्यावा लागेल
पक्षाने स्वतःच्या पातळीवर या प्रकरणाची चौकशी करावी, तसेच ते वैयक्तिकरित्याही याची चौकशी करतील, असेही ते म्हणाले. राहुल यांनी खर्गे यांना पक्षातील गद्दारांना ओळखून त्यांना बाहेर काढण्यास सांगितले.









