शिवसेनेच्या 60 आमदारांविरुद्ध अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा प्रचार; नेत्याचा गौप्यस्फोट
Ajit Pawar's NCP campaign against 60 Shiv Sena MLAs; Leader's revelation

जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा शिवसेना नेते तानाजी सावंत यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसवर बोचरी टीका करत स्वबळाचा नारा दिला होता.
तानाजी सावंत यांच्याविरुद्ध निवडणूक लढवलेल्या राहुल मोटेंनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात प्रवेश केला. त्यानंतर, तानाजी सावंत यांनी नगरपालिका निवडणुकांच्या अनुषंगाने आयोजित मेळाव्यात महायुतीमधील राष्ट्रवादीवर सडकून टीका केली होती.
त्यानंतर, आता पुन्हा एकदा तानाजी सावंत यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर गंभीर आरोप केले आहेत. अजित पवाराच्या राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या 60 आमदारांविरोधात काम केल्याचा धक्कादायक गौप्यस्फोटच सावंत यांनी केला.
अजित पवार जमीन व्यवहार प्रकरणी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
शिवसेना नेते तानाजी सावंत यांनी नगरपालिका निवडणुकांच्या प्रचारानिमित्ताने नवा गौप्यस्फोट केला आहे. अजित पवाराच्या राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या 60 आमदारांविरोधात काम केलं.
माझ्याही मतदार संघात दोन्ही राष्ट्रवादी मिळून महायुतीत असताना एकत्र लढले. त्यामुळे मी टीका केल्यावर त्यांना टीका करण्याचा अधिकार नाही, असेही सावंत यांनी म्हटलं. मतदारसंघातील भूम-परंडा-वाशी नगरपालिका निवडणुकांच्या अनुषंगाने आयोजित प्रचारात त्यांनी हा आरोप केला आहे.
रेल्वेचा मोठा अपघात ;पॅसेंजर ट्रेनचा डबा थेट मालगाडीवर चढला;पहा VIDEO
धाराशिव विधानसभा निवडणुकीत आम्ही महायुती म्हणून एकत्र लढत असताना देखील शिवसेनेचा 60 आमदाराविरोधात अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीने एकत्र येत विरोधात काम केल, असा गौप्यस्फोट तानाजी सावंत यांनी केला. दोन्ही राष्ट्रवादी एक असून राष्ट्रवादी सत्तेशिवाय राहू शकत नाही,
या केलेल्या टीकेवर आज देखील आपण ठाम आहोत. राष्ट्रवादीने माझ्या मतदारसंघात देखील एकत्रितपणे मला विरोध करण्यात आला. मी टीका केल्यानंतर त्यांना उत्तर देण्याचा नैतिक अधिकार राष्ट्रवादीला नसल्याचेही सावंत म्हणाले.
अमेरिकेच्या कंपन्यांमुळे भारतावर मोठं संकट
या घडलेल्या विरोधातील गोष्टी 60 आमदारांनी वरिष्ठ नेत्यांना सांगितल्या का माहित नाहीत, पण मी माझी तक्रार माझ्या नेत्याकडे केली असल्याचे सांगत तानाजी सावंत यांनी एकनाथ शिंदेंच्या कानावर ही बाब घातल्याचे सूचवले.








