मनोज जरांगे पाटील सरकारवर घसरले म्हणाले ,सर्वात नालायक सरकार…
Manoj Jarange lashed out at the Patil government, saying, "The most incompetent government...

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील आणि माजी मंत्री धनंजय मुंडे हे दोघे मागील काही दिवसांपासून एकमेकांवर गंभीर आरोप करत आहेत. धनंजय मुंडे यांनी मला जीवे मारण्याचा कट रचल्याचा धक्कादायक आरोप जरांगे यांनी केला.
शिवसेनेच्या 60 आमदारांविरुद्ध अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा प्रचार; नेत्याचा गौप्यस्फोट
त्यानंतर धनंजय मुंडे यांनी हे सर्व आरोप फेटाळत थेट सीबीआय चाैकशीची मागणी केली. फक्त हेच नाही तर माझी आणि जरांगे दोघांचीही नार्काे टेस्ट करा, असेही धनंजय मुंडेंनी म्हटले.
अमित ठाकरेंच्या मुलाचा पहिलाच उदघाटन सोहळा आणि आयुष्यातील पहिला गुन्हा दाखल
जरांगे यांनीही नार्काे टेस्टसाठी तयार असल्याचे म्हटले. आता पुन्हा एका मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्यावर काही आरोप केली आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले की, हा खूप मोठा विषय आहे.
त्याने अजित पवारांकडे जात म्हटले की, या चाैकशीपासून मला टाळा. मला या चाैकशीपासून दूर ठेवा, मला साथ द्या. नसता माझ्या लोकांना मराठ्याचे लोक मारतील. मी जर चाैकशीला गेलो तर शंका येईल.
VIDEO;न्यू यॉर्कच्या महापौरपदी ममदानी यांचा विजय ;विजयी भाषणात ‘धूम मचाले’चा जलवा
जर तो इतका मोठा कट घडून आणत असेल आणि अजित पवार आणि फडणवीस त्याला क्लीनचिट देत असतील तर मग ही अवघड गोष्ट आहे. आम्ही देवेंद्र फडणवीस यांना मानणाऱ्यापैकी एक होतो. पण असे होणार असेल तर.. तो घातपात घडून आणणार.
देवेंद्र फडणवीस त्याला क्लीनचिट देणार.. तो म्हणतो या चाैकशीपासून मला टाळा.. मला दूर ठेवा…अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस त्याला साथ देणार असतील तर ही खूप जास्त वाईट गोष्ट आहे,
जोपर्यंत कर्जमाफी नाही, तोपर्यंत सरकारला मत देणार नाही असे बोर्ड लावा;उद्धव ठाकरे
असे नालायक सरकार मी आतापर्यंत कधीच बघितले नाही. जे सत्याचे सत्य करत नाहीये. सत्याच्या बाजूने उभा राहत नाहीये. फक्त भाषणातून बोलणार.
सरकार, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यावरील विश्वास उडाला आहे. आम्हाला ही माहिती मिळाली, जर हे खरे असेल तर किती अवघड काम आहे.
पुढील 3 दिवस महाराष्ट्रावर मोठे संकट येणार
तो चार पाच दिवसापूर्वी गेला असेल आम्हाला काल रात्री उशीरा ही माहिती मिळाली. एका निच माणसाला धनंजय मुंडेला तुम्ही वाचवणार असाल तर ही सोप्पी गोष्ट नाहीये, असेही जरांगे पाटील यांनी म्हटले.









