मुख्यमंत्री फडणवीसांचे भाऊ नगरपरिषदेत बिनविरोध विजयी;काँग्रेस आक्रमक, धक्कादायक आरोप

CM Fadnavis' brother wins unopposed in municipal council

 

 

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये बिनविरोध निवडणुकांचा नवा पॅटर्न सुरू झाल्याचं पाहायला मिळत असून सोलापूर जिल्ह्यातील अनगर येथे नगरपंचायत निवडणुकीसाठी 17 नगरसेवक बिनविरोध विजयी झाले.

दिल्लीत अमित शाहांच्या भेटीनंतर काय म्हणाले एकनाथ शिंदे

त्यानंतर, नगराध्यक्षपदीही प्राजक्त पाटील यांची बिनविरोध निवड झाली होती. त्यानंतर, दोंडाई नगरपरिषदेत भाजप नेते तथा मंत्री जयकुमार रावल यांच्या मातोश्री नगराध्यक्षपदी बिनविरोध आल्यानंतर 7 नगरसवेकही बिनविरोध विजयी झाले आहेत.

 

त्यानंतर, अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा नगरपालिका निवडणुकी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मामेभाऊही देखील बिनविरोध निवडून आले आहेत.

 

त्यासाठी, आमदार रवि राणा यांनी पुढाकार घेतला होता. या निवडीनंतर त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच फोन लावल्याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.

लाच घेताना तलाठीला रंगेहात अटक

चिखलदरा नगर पालिका निवडणुकीत आल्हाद कलोती हे निवडणुकीच्या रिंगणात होते. चिखलदरा नगर पालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 10 ब मधून नगरसेवक पदासाठी त्यांनी पहिल्यांचा आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता.

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चुलत मामेभाऊ असलेल्या आल्हाद कलोती यांना बनविरोध विजयी करण्यासाठी स्थानिक नेत्यांनी प्रयत्न केले.

पार्थ पवार जमीन घोटाळा,राहुल गांधी म्हणाले मतचोरी करुन बनलेल्या सरकारची जमीन चोरी, मोदीजी तुमचं शांत

त्यामध्ये, आमदार रवि राणा यांनी पुढाकार घेत अखेर ही निवडणूक बिनविरोध केल्याने आल्हाद कलोती विजयी झाले आहेत. येथील प्रभागातून त्यांच्याविरुद्ध अर्ज भरलेल्या उमेदवाराने माघार घेतल्यामुळे मुख्यमंत्र्‍यांचे मामेभाऊ बिनविरोध नगरसेवक बनले.

 

पहिल्यांदाच निवडणूक लढविणाऱ्या आल्हाद कलोती यांच्या उमेदवारीमुळे चिखलदरा नगर परिषद निवडणुकीकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. मात्र, आज आल्हाद कलोती बिनविरोध निवडून आले आहेत,

हवामान विभागाचा 7, 8, 9 आणि 10 नोव्हेंबरला अलर्ट, मोठा इशारा,

त्यांचे प्रतिस्पर्धी असलेल्यांनी आपली उमेदवारी मागे घेतल्याने ते बिनविरोध निवडून आले आहेत. या विजयानंतर आमदार रवि राणा यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करुन याबाबत माहिती दिली.

 

भाऊ, बिनविरोध झालं अशी माहिती रवि राणा यांनी दिली. तर, मुख्यमंत्र्‍यांनी फोनवरुन अभिनंदन केले, विजयी मामेभावाचेही अभिनंदन करत देवेंद्र फडणवीसांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. दरम्यान, काँग्रेस नेत्या माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी या निवडीवरुन रवि राणांवर जोरदार हल्लाबोल केला.

 

राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी संपली;कोर्टात काय घडले ?
भाजप ही रवी राणा आणि नवनीत राणा यांच्या खुंट्याला बांधली आहे, देवेंद्र फडणवीस याठिकाणी दमदाटी आणि गुंडागर्दी करत आहे. मुख्यमंत्रीपदाचा दुरुपयोग करत आहेत. उमेदवाराना धमक्या दिल्या, पैसे दिले,

 

यांचा डोळा तिथल्या जमिनीवर आहे, असे म्हणत यशोमती ठाकूर यांनी बिनविरोध निवडणुकीवर कठोर शब्दात टीका केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वात क्रूर मुख्यमंत्री म्हणून ओळखले जातील.

शेतकऱ्यांचा संताप निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा

ज्या हिशोबाने संविधानाची तोडफोड करत आहेत, ते योग्य नाही. भाजपमध्ये ओरिजनल कमी आणि भाड्याचे लोक जास्त आहेत. कलोती यांचा पराभव झाला असता, नाचक्की झाली असती म्हणून दमदाटी करण्यात आल्याचा गंभीर आरोपही यशोमती ठाकूर यांनी केला आहे.

 

दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामेभाऊ चिखलदरा नगरपरिषद नगरसेवक पदाच्या निवडणुकीत बिनविरोधी विजयी झाले आहेत. त्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आक्रमक होत आरोप केले.

 

“मत चोरीचा हा भाग आता उमेदवार चोरीचा दुसरा भाग बनला आहे” अशा शब्दात हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. “जो माणूस तिथे राहत नाही,

 

त्याचं नाव मतदार यादीत टाकलं जातं. हे मुख्यमंत्र्यांचे अशोभनीय काम आहे. याचा धिक्कार करतो, याचा निषेध करतो” असा हर्षवर्धन सपकाळ म्हणाले. “मुख्यमंत्र्यांचा एक मामेभाऊ व धर्मदाय आयुक्त आहे तो जमीन विकतो.

 

दुसऱ्याला नगरसेवक बनवून चिखलदरा मधील जमिनी खरेदी करण्याकरता नगरसेवक केलं जात आहे” असा आरोप हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.

 

“मुख्यमंत्र्यांची ही गुंडशाही आहे, ती आता आम्ही खपून घेणार नाही. उमेदवाराला उमेदवारी मागे घेण्यासाठी धमक्या दिल्या जातात. अपहरण केलं जात आहे. आमिष दाखवलं जात आहे.

 

दडपशाही केली जात आहे” असे आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केले. “यामध्ये आर्थिक देवाण-घेवाण, दमदाटी,जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जातायत” असा हर्षवर्धन सपकाळ यांनी मोठा आरोप केला. ‘मुख्य आक्का चिखलदरा प्रकरणाचा देवेंद्र फडणवीस आहेत’ असं हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

 

“देवेंद्र फडणवीस याठिकाणी दमदाटी आणि गुंडागर्दी करत आहेत. मुख्यमंत्री पदाचा दुरुपयोग करत आहेत. उमेदवारांना धमक्या दिल्या, पैसे दिले. यांचा डोळा तिथल्या जमिनीवर आहे.

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात क्रूर मुख्यमंत्री म्हणून ओळखले जातील” असं धक्कादायक वक्तव्य काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी केलं. “ज्या हिशोबाने संविधानाची तोडफोड करत आहे.

 

ते योग्य नाही. भाजपमध्ये ओरिजनल कमी आणि भाड्याचे लोक जास्त आहेत. कलोती यांचा पराभव झाला असता, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नाचक्की झाली असती म्हणून दमदाटी केली.भाजप ही रवी राणा आणि नवनीत राणा यांच्या खुंट्याला बांधली आहे” असा दावा यशोमती ठाकूर यांनी केलाय.

 

 

Related Articles