भारतीय बनावटीचं तेजस विमान कोसळले ;पाहा थरकाप उडवणाराVIDEO
Indian-made Tejas aircraft crashes; watch shocking VIDEO

दुबईतून मोठी बातमी समोर येत आहे. दुबईत एअर शोचं आयोजन करण्यात आलं होतं. या एअर शोमध्ये भारतीय हवाई दलाचं शक्तीशाली असं तेजस या लढाऊ विमानाचा देखील समावेश होता.
पण एअर शो दरम्यान भारतीय बनावटीचं तेजस विमान क्रॅश झालं आहे. अत्यंत मोठा हा अपघात आहे. या अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
पुन्हा अतिमुसळधार पावसाचं मोठं संकट, 16, 17, 18, 19 आणि 20 नोव्हेंबरला अलर्ट जारी
हे विमान अवकाशात झेपावत असताना अचानक खाली येऊ लागलं. ते वरती पुन्हा झेप घेईल असं वाटत असताना ते घडलं नाही. हे विमान खूप जोरात खाली कोसळलं.
यानंतर आगीच्या मोठ्या ज्वाळा बघायला मिळाल्या. तसेच मोठा धूर होताना बघायला मिळाला. या अपघातात पायलटबाबत अद्याप कोणतीही माहिती समजू शकलेली नाही.
अपघात नेमका कसा झाला? याची देखील माहिती अद्याप समजू शकलेली नाही. सध्या या प्रकरणात सखोल तपास केला जात आहे.
१ डिसेंबर ते ३ मार्च दरम्यान २४ रेल्वे गाड्या रद्द
तेजस लढाऊ विमान हे भारतीय बनावटीचं आहे. अत्यंत हलक्या वजनाचं हे लढाऊ विमान आहे. जमिनीवरुन तसेच हवेतून हल्ला करण्यासाठी हे महत्त्वाचं लढाऊ विमान आहे.
हे विमान राफेलसारखं ताकदवान आहे. असं असताना या विमानाचा अपघात झाल्याने अनेकांना धक्का बसला आहे. मानवी चुकीमुळे किंवा तांत्रिक बिघाडामुळे या विमानाचा अपघात झाल्याचा प्रथमदर्शनी अंदाज व्यक्त केला जातोय.
दिल्लीत अमित शाहांच्या भेटीनंतर काय म्हणाले एकनाथ शिंदे
तेजस विमान हे डेमोंट्रेशन फ्लाईट दरम्यान कोसळलं. दुबईच्या स्थानिक वेळेनुसार दुपारी 2 वाजून 10 मिनिटांनी हे विमान कोसळल्याची माहिती आहे. विमानाची कवायत पाहण्यासाठी हजारो प्रेक्षक जमले होते.
पण कवायत करत असताना अचानक हे विमान जमिनीवर कोसळलं. यामुळे कार्यक्रम पाहणाऱ्या हजारो प्रेक्षकांनादेखील मोठा धक्का बसला.
मुख्यमंत्री फडणवीसांचे भाऊ नगरपरिषदेत बिनविरोध विजयी;काँग्रेस आक्रमक, धक्कादायक आरोप
विशेष म्हणजे तेजस विमान चांगली कवायत कण्यासाठी खाली झुकत होतं. पण त्याचदरम्यान विमानाचं नियंत्रण सुटलं आणि अवघ्या काही सेकंदात हे विमान खाली कोसळलं.
ही घटना पाहणाऱ्या प्रेक्षकांनादेखील मोठा धक्का बसला. असं काही घडेल असं कुणाच्याही मनात नव्हतं. विमान जमिनीवर कोसळताच मोठा स्फोट झाला
नगरपालिका निवडणूक भाजपकडून एकाच कुटुंबातील 6 जणांना उमेदवारी राज्यभरात चर्चेत
आणि अल मकतूम इंटरनॅशनल एटरपोर्टच्या वरच्या भागात धुरांचा मोठा लोळ उठताना बघायला मिळाला. या घटनेचे व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
Terrible News of India’s Tejas crashing in Dubai Air show. No ejection by pilot spotted. Heartbreaking scene. Via @zone5aviation
— Aditya Raj Kaul (@AdityaRajKaul) November 21, 2025








