महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप येणार?
Will there be a big earthquake in Maharashtra politics?
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी उदय सामंत हे शिवसेना फोडणार असल्याचा दावा केला आहे. अंधारे यांच्या या दाव्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.
सरकारी कर्मचारी, शिक्षक आणि पोलिसांनीही लाटले लाडक्या बहीण योजनेचे पैसे आता कोणती कारवाई
त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेत अंतर्गत काही धुसफूस आहे का याची चर्चा सुरू झाली आहे. आता सुषमा अंधारे यांनी हा का केला. त्याच्यामागे काय पार्श्वभूमी आहे हे जाणून घेणं महत्वाचं आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू उदय सामंत हेच शिंदेंची शिवसेना फोडणार असल्याचा दावा अंधारे यांनी केला. उदय सामंत शिंदेंच्या शिवसेनेतील एक गट घेऊन भाजपसोबत जाऊ शकतात असा दावा त्यांनी केला.
नगरपंचायत निवडणुकीवर बहिष्कार, कारण वाचून तुम्हीही थक्क व्हाल
सामंत यांना उपमुख्यमंत्री होण्याची महत्वकांक्षा असल्याचंही सांगायला सुषमा अंधारे विसरल्या नाहीत. सुषमा अंधारे यांनी उदय सामंत शिवसेना फोडणार हा दावा केल्याला एक पार्श्वभूमीही पाहायला मिळतेय.
नगरपंचायत निवडणुकीवर बहिष्कार, कारण वाचून तुम्हीही थक्क व्हाल
भाजपच्या ऑपरेशन लोटसमुळे दुखावलेलया एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत केंद्रीय मंत्री अमित शाहांची भेट घेतली. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची तक्रार शिंदे यांनी शाहांकडे केल्याची माहिती सुत्रांकडून मिळतेय.
पुढील 3 दिवस महाराष्ट्रावर मोठे संकट येणार
एकीकडे एकनाथ शिंदें रवींद्र चव्हाणांची तक्रार अमित शाहांकडे करत होते. तर दुसरीकडे त्याचवेळी शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली.
आता ही भेट कमी की काय सामंत यांनी चव्हाण यांचं कौतुकही केल्याचं पाहायला मिळालं. आणि त्यामुळे अंधारेंच्या या दाव्याला बळ मिळतंय..
उदय सामंत यांनी रवींद्र चव्हाण यांचं कौतुक केल्यानंतर सुषमा अंधारे यांनी थेट सामंत शिवसेना फोडमार असल्याचा दावा केलाय. यावर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी प्रत्युत्तर दिलंय.
अब्दुल सत्तार यांनी दिल्या आमदार निधीतून स्वत:च्याच शिक्षण संस्थेला 32 लाखांच्या रुग्णवाहिका
मला माझ्या राजकीय मर्यादा माहीत आहेत. एकनाथ शिंदेंनी आपल्याला उद्योगमंत्री केल्याचंही यावेळी सामंत म्हणालेत. तर, सुषमा अंधारे यांनी केलेला हा दावा भाजपने फेटाळून लावलाय..
रवींद्र चव्हाण यांच्याबाबत कोणतीही तक्रार नाही असं एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केलंय.तर उदय सामंत यांनी जाहिर पणे रवींद्र चव्हाणांचं कौतुक केलंय..तीनही पक्ष एकसंध असल्याचं न्हणत बन यांनी अंधारे यांचा समाचार घेतलाय.
Video Viral लष्करी हेलिकॉप्टरचे दोन तुकडे झाले अन्… ; भयानक घटना
तर, पक्ष फोडण्यासाची भाजपला सवय आहे. आधीच त्यांनी दोन पक्ष फोडले आहेत. आता त्यांच्यासोबत असणारे पक्ष फोडण्याचीही भाजपची तयारी असल्याचं म्हणज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपवर हल्लाबोल केलाय.
एकीकडे एकनाथ शिंदे अमित शाहांची भेट घेत रवीद्र चव्हाणांबाबत नाराजी व्यक्त करतात तर दुसरीकडे त्याच्याच पक्षाचे मंत्री उदय सामंत रवींद्र चव्हाणांचं कौतुक करतात.
5 विमानतळं बॉम्बने उडवणार, धमकीने खळबळ
या विरोधाभासावर सुषमाअंधारे यांनी बोट ठेवत सामंत शिवसेना फोडणार असल्याचा दावा केलाय.. असाच दावा काही काळापूर्वी ठाकरेंचं खासदार संजय राऊत यांनीही केला होता. यावरून आता तर्कवितर्कांना सुरूवात झालीय.







