साडे पाच हजार रुपयांची लाच घेताना महिला नायब तहसीलदारास अटक

Female Deputy Tehsildar arrested while accepting bribe of Rs. 5,500

 

 

लाखो रुपये पगार असताना ही अधिकाऱ्यांना लाच घेण्याचा मोह काही सुटत नाही. नांदेडमध्ये महिला नायब तहसीलदार अवघ्या 5 हजार 700 रुपयासाठी लाचेच्या जाळ्यात अडकल्या आहेत.

 

हदगावमध्ये एका रेशन दुकानदाराकडून रेशन पुरवठा योजनेवरील कमिशन म्हणून नायब तहसीलदाराने डेटा एन्ट्री ऑपरेटरच्या माध्यमातून लाच मागितली होती.

डिसेंबरपासून नवा कायदा लागू;१६ वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया वापरावर बंदी

तक्रार प्राप्त झाल्यानंतर लाच लुचपत विभागाने सापळा रचत नायब तहसीलदार सुमन कऱ्हाळे यांना अटक केली. या कारवाईमुळे हदगाव तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

 

तक्रारदाराचे हदगाव तालुक्यात रेशन दुकानं आहे. तक्रारदाराला मागील चार महिन्याचा धान्य पुरवठा झाला होता. त्यातून दुकानदाराला 5 हजार 700 रुपये कमिशन प्राप्त झाले होते.

 

शिवाय नोव्हेंबर महिन्याचे ई-पॉज मशीनमध्ये धान्याचे अपलोड झाले नव्हते. रेशचे धान्य अपलोड करण्यासाठी आणि 27 नवीन लाभार्थ्यांचे नाव अपलोड करण्यासाठी तक्रारदाराने

भूकंपाचे जोरदार झटके; नागरिकांमध्ये प्रचंड घबराट

18 नोव्हेंबर रोजी हदगाव तहसील कार्यलयात कार्यरत असलेल्या निरीक्षक अधिकारी तथा नायब तहसीलदार सुमन संभाजी कऱ्हाळे यांची भेट घेऊन इ-पॉज मशीनवर नोव्हेंबर महिन्याचे धान्य अपलोड करण्याची विनंती केली.

 

यावेळी महिला अधिकाऱ्याने चार महिन्याचे रेशनचे 57 हजाराचे 20 टक्के रक्कम लाच म्हणून मागितली.

डाटा एन्ट्री ऑपरेटर पदावर असलेल्या गोविंद आप्पाराव जाधव यांना लाच देण्यास सांगितलं. तडजोडी अंती 10 टक्के म्हणजेच 5 हजार 700 रुपये देण्यास ठरलं.

उमराह साठी सौदी अरेबियात गेलेल्या भाविकांच्या बस ला अपघात 42 भारतीयांचा मृत्यू, मुख्यमंत्री कार्यालय अलर्ट

दरम्यान, रेशन दुकानदाराने तक्रार दिल्यानंतर लाच लुचपत विभागच्या पथकाने काल शनिवारी तहसील कार्यालयातच सापळा रचला.

 

डाटा एन्ट्री ऑपरेटर गोविंद जाधव याला स्वतःसाठी आणि नायब तहसीलदार यांच्यासाठी लाच घेताना पथकाने रंगेहाथ पकडलं. लाच लुचपत अधिकाऱ्यांनी नायब तहसीलदारासह अन्य एकाला ताब्यात घेऊन अंगझडती घेतली.

नगरपालिका निवडणूक भाजपकडून एकाच कुटुंबातील 6 जणांना उमेदवारी राज्यभरात चर्चेत

यावेळी दोन मोबाईल जप्त केले. नायब तहसीलदार कऱ्हाळे यांना अटक करण्यात आली असून डाटा एन्ट्री ऑपरेटर गोविंद जाधव याला वैद्यकीय कारणास्तव नोटीसवर सोडून देण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान, या कारवाईमुळे हदगावमध्ये खळबळ उडाली आहे.

 

Related Articles