महाराष्ट्र देशात सर्वात जास्त कर्जाचा डोंगर असणारे राज्य

Maharashtra is the state with the highest debt burden in the country.

 

 

महिला अत्याचार आणि भ्रष्टाचाराच्या प्रकरणांत देशातील सर्व राज्यांना मागे टाकल्यानंतर महाराष्ट्र आता कर्जबाजारीपणातही देशातील सर्वात वरच्या क्रमांकावर पोहोचला आहे.

साडे पाच हजार रुपयांची लाच घेताना महिला नायब तहसीलदारास अटक

नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरोच्या अहवालानुसार महिला अत्याचार आणि भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यांत महाराष्ट्र अव्वल ठरला आहे. तर, रिझर्व्ह बँकेच्या ताज्या अहवालात राज्याची आर्थिक बेशिस्ती गंभीर पातळीवर गेल्याचे स्पष्ट झाले आहे.

 

सोने-चांदीच्या दरात घसरण सुरूच
राज्याच्या अर्थसंकल्पीय अंदाजांनुसार महाराष्ट्रावर सध्या सुमारे ८.५५ लाख कोटी रुपये कर्ज आहे. येत्या २०२५ अखेरीस हा आकडा ९.४२ लाख कोटी रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

 

गेल्या तीन वर्षांत—म्हणजे २०२२ ते २०२५ या कालावधीत—राज्याच्या कर्जात तब्बल ३ लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

 

कोणतेही दीर्घकालीन नियोजन न करता महसुली खर्च प्रचंड वाढवणे, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या घोषणांचा पाऊस पाडणे आणि ‘लाडकी बहीण’ सारख्या उच्चखर्ची योजनांनी राज्याच्या आर्थिक आरोग्यावर मोठा ताण निर्माण झाल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे.

विज्ञान हे केवळ यशाबद्दल नाही; ते अपयशातून शिकण्याबद्दल देखील आहे; डॉ. सय्यद इलियास

त्यातच व्याजाच्या स्वरूपातील आर्थिक जबाबदारी सातत्याने वाढत असल्याने राज्याची आर्थिक स्थिती आणखी बिकट होत चालल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.

 

देशातील राज्यांच्या वित्तीय स्थितीचा ताजा अंदाज जाहीर झाला असून, २०२५ अखेर कोणती राज्ये सर्वाधिक कर्जबाजारी ठरणार आहेत, याचे आकडे पुढे आले आहेत. लाख कोटी रुपयांमधील या कर्जाच्या यादीत महाराष्ट्र अव्वल स्थानावर आहे.

बॉलिवूड स्टार ‘ही-मॅन’ धर्मेंद्र यांचे निधन, 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

 

टॉप १० कर्जबाजारी राज्ये (२०२५ अखेर अंदाज – लाख कोटींमध्ये):

महाराष्ट्र – ९.३२ लाख कोटी
उत्तर प्रदेश – ८.३ लाख कोटी
तमिळनाडू – ७.८ लाख कोटी
पश्चिम बंगाल – ६.८ लाख कोटी
राजस्थान – ५.९ लाख कोटी
गुजरात – ५.० लाख कोटी
कर्नाटक – ४.७ लाख कोटी
बिहार – ४.५ लाख कोटी
पंजाब – ३.८ लाख कोटी
हरियाणा – ३.२ लाख कोटी

 

 

अहवालानुसार, आर्थिक भार, शासकीय खर्च, प्रलंबित प्रकल्प आणि महसूल तुटीमुळे अनेक राज्यांचे कर्ज सातत्याने वाढत असून पुढील काळातही ही वाढ कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जाते.

 

Related Articles