मराठवाड्यातील राहुल गांधीं आणि एकनाथ शिंदेच्या एकत्रित” या ” फोटोची होतेय राज्यभरात चर्चा
A photo of Rahul Gandhi and Eknath Shinde together in Marathwada is being discussed across the state.

शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे.
CBI अधिकारी असल्याचे सांगून चोरट्यांनी २७ लाखाला गंडवले
सध्या सोशल मीडियावर निवडणुकीच्या प्रचाराचे एक बॅनर व्हायरल होत आहे. या बॅनरवर एकनाथ शिंदे, सोनिया गांधी आणि राहुल गांधी या तिघांचा एकत्र फोटो पाहायला मिळत आहे.
पुन्हा एकदा एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री होणार ?
हे बॅनर पोस्ट करत अंबादास दानवे यांनी एकनाथ शिंदेंवर जोरदार टीका केली आहे. यामुळे सध्या राज्याच्या राजकारणात एकच चर्चा सुरु आहे.
अंबादास दानवे यांनी त्यांच्या अधिकृत ट्वीटरवरुन एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी एका बॅनरचा फोटो पोस्ट केला आहे. या बॅनरमध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी
दिल्लीत अमित शाहांच्या भेटीनंतर काय म्हणाले एकनाथ शिंदे
आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे फोटो दिसत आहेत. विशेष म्हणजे या बॅनरवर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह देखील स्पष्टपणे पाहायला मिळत आहे.
हा बॅनर उमरगा नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचाराचा आहे. शिवसेना-काँग्रेस-लहुजी शक्ती सेना-रयत क्रांती व मित्र शहर विकास पॅनलचे नगराध्यक्ष पदाचे व प्रभाग क्रं. २ चे अधिकृत उमेदवार, असे या बॅनरवर नमूद करण्यात आले आहे. यावरुन अंबादास दानवेंनी शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे.
सरकारी कर्मचारी, शिक्षक आणि पोलिसांनीही लाटले लाडक्या बहीण योजनेचे पैसे आता कोणती कारवाई
काँग्रेस नको म्हणून छाती बडवत सुरत-गुवाहाटी-गोवा असा पळपुटा प्रवास केलात आणि नाकाने वांगे सोलले… आता घ्या! कटप्रमुख एकनाथ शिंदे, सोनिया गांधी आणि राहुल गांधी एकाच बॅनरवर.. ते ही धनुष्यबाण चिन्हासह !
थोडक्यात, दिल्लीश्वरांच्या भीतीने ‘बाळासाहेबांचे विचार’ खुंटीला टांगले आहेत.” “याला म्हणतात बुडाखालील अंधार !, असे अंबादास दानवे यांनी म्हटले आहे. अंबादास दानवे यांनी ही पोस्ट अमित शाह आणि महाराष्ट्र भाजपलाही टॅग केली आहे.
विज्ञान हे केवळ यशाबद्दल नाही; ते अपयशातून शिकण्याबद्दल देखील आहे; डॉ. सय्यद इलियास
अंबादास दानवे यांनी या राजकीय विरोधाभासावर बोट ठेवत शिंदे गटाच्या भूमिकेवर ताशेरे ओढले आहेत. बंडखोरी करताना बाळासाहेबांचे विचार वाचवण्याचे कारण देणाऱ्या शिंदे गटावर त्यांनी गंभीर आरोप केला.
यामुळे भाजप आणि शिंदे गट यांच्या महायुतीतील स्थानिक राजकीय गणितांवर प्रश्न निर्माण झाले आहेत. महायुतीमध्ये असताना स्थानिक निवडणुकीत काही ठिकाणी भाजप-शिंदे गटाला काँग्रेसशी जुळवून घ्यावं लागत असल्याचे पाहायला मिळत आहे.
मंत्री पंकजा मुंडे यांच्या पीएच्या डॉक्टर पत्नीची आत्महत्या
त्यातच काँग्रेससोबत असल्यामुळे बाळासाहेबांचे विचार सोडल्याचा आरोप करत शिंदे गटाने शिवसेनेतून बंडखोरी केली होती. मात्र, आता त्याच काँग्रेस नेत्यांचे फोटो बॅनरवर दिसल्याने शिवसेना शिंदे गटावर जोरदार टीका केली जात आहे.








