काँग्रेसच्या पराभवासाठी भाजपने केला अमेरिकेच्या CIAआणि इस्राईलच्या मोसादचा वापर ?

BJP used America's CIA and Israel's Mossad to defeat Congress

 

 

काँग्रेसला सत्तेतून दूर करण्यासाठी अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा सीआयए आणि इस्रायलची गुप्तचर यंत्रणा मोसादनं कट रचला होता. भारतात काँग्रेसचं किंवा काँग्रेससह मित्रपक्षांचं सरकार स्थापन होऊ द्यायचं नाही,

 

असा विडाच परदेशातील गुप्तचर यंत्रणांनी उचलला होता. त्यामुळेच २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला, असा सनसनाटी दावा काँग्रेसचे माजी खासदार कुमार केतकर यांनी केला आहे.

निवडणुकांवर सुप्रीम कोर्टाची स्थगिती नाही ,मात्र टांगती तलवार कायम

२०१४ मध्ये लागलेला निकाल हे जनमत नव्हतं. त्यावेळी सरकारबद्दल नाराजी होती. पण त्यावेळी आलेला निकाल या काही जनादेश नव्हता, असं केतकर म्हणाले आहेत.

 

वृत्तसंस्था पीटीआयनं कुमार केतकर यांचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात त्यांनी २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीबद्दल सनसनाटी दावे केले आहेत.

सरकारचा मोठा निर्णय ;आधार कार्डावर आधारित तयार केलेली सर्व जन्म प्रमाणपत्रे रद्द

हा व्हिडीओ २६ नोव्हेंबर २०२५ रोजीचा असल्याची माहिती समोर आली आहे. संविधान दिनानिमित्त काँग्रेस पक्षानं आयोजित केलेल्या कार्यक्रमात कुमार केतकर बोलत होते. ते काँग्रेसचे राज्यसभेचे माजी खासदार आहेत.

 

‘काँग्रेसनं २००४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत १४५ जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर २००९ मध्ये झालेल्या निवडणुकीत पक्षाच्या जागा वाढून २०६ वर गेल्या.

शिंदेंचे ३५ आमदार नाराज! ऑपरेशन लोटसमध्ये पक्ष फुटणार?

हाच ट्रेंड कायम राहिल्यास २०१४ मध्ये काँग्रेसला २५० जागा मिळू शकत होत्या. पक्ष अगदी आरामात सत्तेत राहिला असता. पण २०१४ मध्ये काँग्रेसच्या जागा थेट ४४ वर आल्या,’ अशी आकडेवारी कुमार केतकर यांनी मांडली.

 

काँग्रेसच्या पराभवामागे अमेरिकेची सीआयए आणि इस्रायलची मोसाद अशा दोन गुप्तचर यंत्रणा होत्या, असा दावा केतकर यांनी केला. काँग्रेस सत्तेत कायम राहिल्यास आपल्याला भारतात हस्तक्षेप करता येणार नाही,

उमराह साठी सौदी अरेबियात गेलेल्या भाविकांच्या बस ला अपघात 42 भारतीयांचा मृत्यू, मुख्यमंत्री कार्यालय अलर्ट

असं दोन्ही यंत्रणांना वाटत होतं. त्यांना आपल्या हिशोबानं धोरणं लागू करायची होती. काँग्रेस सरकार त्यात अडथळा ठरणार होतं. त्यामुळे २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत या दोन्ही देशांनी हस्तक्षेप केला, असा दावा केतकर यांनी केला.

 

‘मोसादनं भारतीय राज्यं आणि मतदारसंघांचा सविस्तर आणि सखोल डेटा गोळा केला. निवडणूक प्रक्रियेवर परिणाम करण्यासाठी सीआयए आणि मोसादनं मतदारांची सखोल माहिती तयार ठेवली होती.

उपमुख्यमंत्री शिंदें अण्णा हजारेंना का भेटले ?‘हे’ कारण आले समोर

त्यावेळी पंतप्रधानपदी असलेल्या मनमोहन सिंग यांच्याबद्दल काही प्रमाणात नाराजी होती. पण ती नाराजी इतकी नव्हती की त्यामुळे काँग्रेस २०६ वरुन ४४ वर येईल. २०१४ मध्ये आलेला निकाल हा जनादेश नव्हता,’ असा दावा केतकर यांनी ठामपणे केला.

 

 

Related Articles